Join us
Daily Top 2Weekly Top 5

Raj Kundra Case: पोलिसांच्या रेडदरम्यान रडली होती शिल्पा शेट्टी; राज कुंद्रासोबतही झाला होता वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 23:19 IST

पॉर्न फिल्म्स उद्योगासंदर्भात पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन तिचीही चौकशी केली होती. यावेळी राज कुंद्राही सोबत होता. सांगण्यात येते, की यावेळी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात वादही झाला.

मुंबई - बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती तथा बिझनेसमन राज कुंद्रा अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या माध्यमाने रिलीज करण्याच्या आरोपाखाली सध्या अटकेत आहे. नुकतेच राजचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. यातच राज आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगण्यात येते, की 23 जुलैला शिल्पा शेट्टीच्या घरी पोलीस रेडदरम्यान, काही असे घडले, की ज्याची कुणीही कल्पना केली नसेल.

Pornography Case : राज कुंद्राची अडचण वाढली! 4 कर्मचारी होणार सरकारचे साक्षीदार; क्राइम ब्रांचला सांगितले रॅकेटचे सर्व 'राज'

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, पॉर्न फिल्म्स उद्योगासंदर्भात पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन तिचीही चौकशी केली होती. यावेळी राज कुंद्राही सोबत होता. सांगण्यात येते, की यावेळी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात वादही झाला. माध्यामांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, आपले निवेदन नोंदविताना शिल्पा शेट्टी पोलिसांसमोरच ढसाढसा रडू लागली होती. तसेच शिल्पाने आपला पती राज कुंद्रा निर्दोश असेल्याचेही म्हटले आहे. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, चौकशीदरम्यान शिल्पाने साधारणपणे रडतानाच, तिला वादग्रस्त अॅप हॉटशॉटवर काय कंटेंट दिखविला जात होता, यासंदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस माहिती नव्हती, असे म्हटले आहे. शिल्पाने म्हटले आहे, की इरॉटिका, पॉर्नपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. एवढेच नाही, तर आपला पती राज कुंद्राचा पॉर्न फिल्म्सशी काहीही संबंध नाही, असा दावाही शिल्पाने केला आहे. 

डायमंड रिंगपासून ते बुर्ज खलीफात फ्लॅटपर्यंत, राज कुंद्रानं शिल्पाला दिले आहेत हे अत्यंत महागडे गिफ्ट्स

या प्रकरणात राज कुंद्रासह एकूण 11 जणांना 19 जुलैला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म्सच्या व्यवसायाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सांगण्यात येते, की या व्यवसायात राज कुंद्राने मोठा पैसा लावला होता आणि यातून तो मोठा नफाही कमवत होता. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रापोलिसबॉलिवूडगुन्हेगारी