Join us
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात वाचली प्रियंका चोप्रा, मानेवर मोठी जखम, 'देसी गर्ल'ची अशी अवस्था पाहून चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 10:32 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय. यातच तिच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. प्रियंका चोप्राचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिच्या मानेवर मोठी दुखापत झाल्याचं दिसून येतंय. एका  मोठ्या अपघातामधून प्रियंका थोडक्यात वाचली आहे. 

अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिच्या मानेवर स्पष्टपणे जखम दिसत आहेत. प्रियंकाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या कामातील धोका'. यासोबत 'ब्लफ' देखील लिहिलं आहे. ज्यावरून स्पष्ट होतं की,  अभिनेत्रीला ही दुखापत 'द ब्लफ'मधील एक स्टंट सीन शूट करताना झाली आहे. सध्या प्रियंका ही तिच्या आगामी 'द ब्लफ' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

प्रियांका चोप्राचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो समोर आल्यापासून 'देसी गर्ल'चे चाहते तिची काळजी करत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियांकाला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. एप्रिल महिन्यातही प्रियांका जखमी झाली होती.  त्यावेळी दुखापत तिच्या चेहऱ्याला झाली होती. 

'बेवॉच' या सिनेमातून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'लव्ह अगेन', 'द मॅट्रिक रिसेरक्शन', 'इज नॉट इट रोमँटिक', 'ए किड लाइक जेक', 'क्वांटिको' या सिनेमांमध्ये ती दिसली. सिटाडेल या वेब सीरिजमध्येही प्रियांकाने काम केलं आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीसोशल मीडियाबॉलिवूडहॉलिवूडसिनेमाअपघात