Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रितीला Opps Moment पासून वाचवण्यासाठी समोर आला होता सुशांत, व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 15:44 IST

सुशांतचा हा व्हिडीओ 'राब्ता' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च वेळीचा आहे. या व्हिडीओत सुशांतने क्रितीला मीडियासमोर 'उप्स मोमेंट'चा शिकार होण्यापासून वाचवलं होतं.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनापासून अभिनेत्री क्रिती सेननचं नवा बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणांनी समोर आलंय. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या काही जुन्या नोट्स सापडल्या असून त्यातही क्रितीचं नाव समोर आलं आहे. यात त्याने क्रितीसोबत जास्त वेळ घालवण्याबाबत लिहिलं आहे. आता क्रिती आणि सुशांतचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय.

सुशांतचा हा व्हिडीओ 'राब्ता' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च वेळीचा आहे. या व्हिडीओत सुशांतने क्रितीला मीडियासमोर 'उप्स मोमेंट'चा शिकार होण्यापासून वाचवलं होतं. क्रिती या इव्हेंटमध्ये फार शॉर्ट ड्रेस घालून पोहोचली होती. जेव्हा बसायची वेळी आली तेव्हा तिने सुशांतला इशारा केला. सुशांत लगेच तिच्या आणि कॅमेराच्या मधे येतो. तेव्हा क्रिती आरामात बसते. हा व्हिडीओ जुना आहे. पण आता पुन्हा क्रितीचं नाव समोर आल्याने व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडीओ पाहून सुशांतला जंटलमेन म्हटलंय.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यादरम्यान त्याच्या क्रिती सेननच्या बॉंडिंगच्या बातम्या येऊ लागल्याने हा व्हिडीओ व्हायरल झालाय. सुशांतची कॉमन फ्रेन्ड लीजा मलिकने नुकताच दावा केला की, सुशांत आणि क्रिता एकमेकांना डेट करत होते. तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, भलेही दोघांनी कधी मान्य केलं नाही. पण सर्वांनाच माहीत होतं की, त्यांच्यात काहीतरी आहे.

सुशांत सिंह राजपूत केसचा तपास सध्या सीबीआय करत आहे. यातील ड्रग्स प्रकरण समोर आल्यावर सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली. यात काही ड्रग्स पॅडलर्सनाही अटक झाली आहे. या पॅडलर्सचं कनेक्शन रियाचा भाऊ शौविकसोबत असल्याचं समोर आलं आहे.

हे पण वाचा :

सुशांत आणि क्रिती एकमेकांना डेट करत होते, एका अभिनेत्रीने बर्थडे पार्टीचा उल्लेख करत केला दावा

क्रिती सॅननने इशाऱ्यातून व्यक्ती केली नाराजी, म्हणाली - आता हे तुझ्याबाबत राहिलेलं नाही...

अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत आणि क्रिती सनॉनचे जुळले होते सूत, पण...

टॅग्स :क्रिती सनॉनसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड