Join us  

Koffee With Karan 8: कतरिना कैफ पती विकी कौशलला या नावाने मारते हाक, अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 6:45 PM

Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण ८ शोचा लेटेस्ट प्रोमो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी शोमध्ये कियारा आडवाणी आणि विकी कौशल हजेरी लावणार आहेत.

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सध्या त्याचा लोकप्रिय शो कॉफी विथ करण ८(Koffee With Karan 8)मुळे चर्चेत आहे. या शोच्या नव्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यावेळेला करण जोहरच्या शोमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणी(Kiara Advani)सोबत सॅम बहादूर फेम अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)ने हजेरी लावली होती. त्याने शोमध्ये प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग खुलासे केले आहेत. यावेळी विकी कौशलने कतरिना त्याला कोणत्या नावाने हाक मारते, याचा खुलासा केला आहे.

कॉफी विथ करण ८ शोचा लेटेस्ट प्रोमो करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या प्रोमोची सुरुवात विकी आणि कियाराच्या इंट्रोडक्शनने होते. कियारा आणि विकी दोघे मॅचिंग कपड्यांमध्ये दिसत आहेत. विकीने ब्लॅक रंगाचा सूट परिधान केलेला दिसत आहे. तर कियारा आडवाणीने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे.

कतरिना विकीला या नावाने मारते हाककॉफी विथ करण शोमध्ये करण जोहर विकी आणि कियारासोबत खूप गप्पा मारताना दिसणार आहे. यासोबतच एक मजेशीर खेळ देखील खेळणार आहे. या खेळात करणने विकीला विचारले की, तुमचा जोडीदार तुम्हाला ज्या तीन नावांनी हाक मारतो ते नाव सांगा. याला उत्तर देताना विकी कौशल म्हणाला की, "बूबू, बेबी आणि हेहेय", अभिनेत्याचे हे उत्तर ऐकून केवळ करणच नाही तर कियाराही जोरजोरात हसायला लागली.

विकी-कियाराचा व्हिडिओ झाला होता व्हायरलशो दरम्यान, कियारा आणि विकी कौशल अभिनेत्री कतरिना कैफच्या लोकप्रिय गाणे 'चिकनी चमेली'वर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर त्यांचे चाहते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशलचा 'सॅम बहादूर' १ डिसेंबर, २०२३ रोजी रिलीज झाला. हा चित्रपट रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर देत आहे.

टॅग्स :विकी कौशलकतरिना कैफकियारा अडवाणीकरण जोहरकॉफी विथ करण 6