Join us

विकी-कतरिनाच्या लग्नाचं कियाराला आमंत्रण नाही; अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 12:45 IST

katrina -vicky wedding: येत्या ९ डिसेंबर रोजी ही जोडी राजस्थानमध्ये राजेशाही थाटात लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या हे दोघंही त्यांच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) आणि विकी कौशल (vicky kaushal) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी ही जोडी राजस्थानमध्ये राजेशाही थाटात लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या हे दोघंही त्यांच्या लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहेत. विशेष म्हणजे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा होणार असून सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. इतंकच नाही तर या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना वगळण्यात आलं आहे. यामध्येच अभिनेत्री कियारा आडवाणीलादेखील लग्नाचं निमंत्रण न दिल्याचं सांगण्यात येत आहे. खुद्द कियारानेच याविषयी खुलासा केला आहे.

अलिकडेच एका मुलाखतीत कियाराने तिला विकी-कतरिनाच्या लग्नाचं आमंत्रण न मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. इतंकच नाही तर खरंच ते लग्न करतायेत का? असा प्रश्नही तिने प्रसारमाध्यमांमध्ये विचारला आहे.

"कियारा, लवकरच विकी-कतरिना लग्न करतायेत. तू या लग्नाला जाणार आहेस का? " असा प्रश्न कियाराला विचारण्यात आला होता. त्यावर  "खरंच?  त्यांच्या लग्नाच्या चर्चा माझ्या कानावर आल्या आहेत. मात्र, अद्याप मला आमंत्रण मिळालेलं नाही", असं उत्तर कियाराने दिलं.

दरम्यान, कियारा आणि विकीने नेटफ्लिक्सच्या लस्ट स्टोरीजमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.  त्यामुळे विकीने कियाराला लग्नाचं आमंत्रण द्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून उमटत आहे. इतकंच नाही तर सलमान खान, रणबीर कपूर यांनीही लग्नाचं आमंत्रण न मिळाल्याचं सांगण्यात येतं. विकी-कतरिना राजस्थानमधील सवाई माधोपूरा येथे सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे लग्नगाठ बांधणार आहेत. हा लग्नसोहळा ७ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत रंगणार आहे. 

टॅग्स :कियारा अडवाणीविकी कौशलकतरिना कैफबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा