Join us

बोंबला! आता गायीला मिठी मारून स्ट्रेस दूर करण्यासंबंधी रिसर्चवर भडकली कंगना, पण का भौ?

By अमित इंगोले | Updated: October 13, 2020 15:56 IST

आता गायींबाबत करण्यात आलेल्या एका रिसर्चवरून कंगनाने पोस्ट केली आहे. आपल्या या पोस्टमधून कंगना या रिसर्चवर भडकली आहे. 

कंगना रणौत जेव्हापासून ट्विटरवर आली आहे तेव्हापासून तिची प्रत्येक पोस्ट काहीना काही कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारसोबतच तिचं वाजलं होतं. नंतर मुंबईतील बत्ती गुल झाल्यावर कंगनाने शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोटो शेअर करून त्यांना चिमटा काढला होता. आता गायींबाबत करण्यात आलेल्या एका रिसर्चवरून कंगनाने पोस्ट केली आहे. आपल्या या पोस्टमधून कंगना या रिसर्चवर भडकली आहे. 

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये एक रिसर्ट पोस्ट केला आहे. ज्यात Cow Cuddling म्हणजे गायीला मिठी मारून रिलॅक्सिंग टाइम घालवण्याबाबत सांगण्यात आलं आहे. या रिसर्चमध्ये वेलनेससाठी आणि स्ट्रेस घालवण्यासाठी गायीला मिठी मारणे, गायीसोबत वेळ घालवण्याबाबत सांगण्यात आलं आहे. तसंच या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, याने पॉझिटिव्हिटी येते आणि लोकांमध्ये ऑक्सिटॉसिन वाढून स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. (हे ‘किएटीव्ह’ दहशतवादी...! कंगना राणौत आता ‘जाहिराती’वर नाराज)

कंगनाने पोस्टमध्ये लिहिले की, 'जेव्हा हेच काम भारतीय लोक करतील तर ते आपल्यावर हसतील. त्यानंतर गुपचूपपणे यावर रिसर्च करतील आणि मग यातून कमाई करण्यासाठी ते याचं काहीतरी फॅन्सी नाव ठेवतील. भारतीयांना या फ्रॉडबाबत नक्कीच माहीत असायला पाहिजे'. (हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने शेअर केला होता देवी लक्ष्मीचा फोटो, कंगना म्हणाली - आपल्याकडे तर...)

कंगना ट्विटरवर बरीच अ‍ॅक्टिव असते. याआधी कंगनाने एक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, मुंबईतील तिच्या ऑफिस पाडण्यात आल्याने तिचे मित्र आणि फॅन्स फार नाराज आहेत. कंगनाने ट्विट करून तिच्या फॅन्सचं दु:खं सांगितलं आणि फॅन्सच्या लेटरचा फोटोही शेअर केला. (‘’बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार,’’ कंगना राणौतचा पुन्हा एकदा वार)

कंगनाने तिच्या फॅन्सकडून आलेल्या लेटरचे आणि गिफ्ट्सचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत कंगनाने लिहिले की, 'माझे फॅन्स/मित्र माझं घर तोडल्यामुळे फार दु:खी आहेत. यांचा हा सामूहिक प्रयत्न मला प्रेरित करतो. या मूर्ती माझ्या त्या मंदिराची सुंदरता आणि पवित्रता वाढवतील ज्याला तोडण्यात आलं. आणि मला नेहमी याची आठवण करून देतील की, जगात क्रूरतेपेक्षा जास्त दया आहे'. 

टॅग्स :कंगना राणौतसोशल व्हायरलसोशल मीडियाबॉलिवूडट्विटर