हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने शेअर केला होता देवी लक्ष्मीचा फोटो, कंगना म्हणाली - आपल्याकडे तर...

By अमित इंगोले | Published: October 13, 2020 09:40 AM2020-10-13T09:40:07+5:302020-10-13T09:43:45+5:30

कंगनाने सलमा हायकचं ट्विट रिट्विट करत लिहिले की, जगाच्या अनेक भागांमध्ये मला अप्रत्यक्षपणे कृष्णा, शिवा आणि देवी भक्त भेटले आहेत

Kangana Ranaut reacts on Hollywood actress Salma Hayek post about goddess Laxmi | हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने शेअर केला होता देवी लक्ष्मीचा फोटो, कंगना म्हणाली - आपल्याकडे तर...

हॉलिवूड अभिनेत्री सलमा हायकने शेअर केला होता देवी लक्ष्मीचा फोटो, कंगना म्हणाली - आपल्याकडे तर...

googlenewsNext

कंगना रणौत अनेक मुद्द्यांवर बेधडकपणे कमेंट करत असते. ती बॉलिवूड, राजकारणासोबतच आध्यात्मावरही आपली मते शेअर करत असते. नुकतंच तिने हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायकचं एक ट्विट रिट्विट केलं आहे आणि म्हणाली की, तिला जगाच्या अनेक भागांमध्ये हिंदू देवी-देवतांवर श्रद्धा असणारे लोक भेटले आहेत. 

कंगनाने सलमा हायकचं ट्विट रिट्विट करत लिहिले की, जगाच्या अनेक भागांमध्ये मला अप्रत्यक्षपणे कृष्णा, शिवा आणि देवी भक्त भेटले आहेत. ते कोणत्याही धर्माचे किंवा मूळाचे लोक असो ते भगवान रामावरही प्रेम करतात आणि भगवत गीतेला फॉलो करतात. पण आपल्या देशात काही लोक भक्तीची खिल्ली उडवतात. स्पष्ट आहे की, आपण आस्थेला निवडत नाही तर आस्था आपल्याला निवडते. ( ‘’बॉलिवूड ड्रग्स, नेपोटिझम आणि शोषणाचे गटार,’’ कंगना राणौतचा पुन्हा एकदा वार)

काय म्हणाली होती सलमा?

याआधी अभिनेत्री सलमा हायकने इन्स्टाग्रामवर देवी लक्ष्मीचा फोटो शेअर करत लिहिले होते की, 'जेव्हा मला माझ्या अंतर्गत सुंदरतेची जुळायचं असतं तेव्हा मी मेडिटेशन करताना देवी लक्ष्मीबाबत ध्यान करणे सुरू करते. ती हिंदू धर्मात धन, भाग्य, प्रेम, सुंदरता, माया, आनंद आणि समृद्धीची देवी मानली जाते. या देवीच्या फोटोने मला आनंद मिळतो आणि आपल्या आतील सुंदरतेला बघण्यासाठी हा सर्वात चांगला दरवाजा आहे'. (कंगनाचे पुन्हा टीकास्त्र, वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर शेअर केला राऊतांचा 'तो' फोटो)

दरम्यान, सलमाच्या फॅन्सना तिची ही पोस्ट फारच आवडली होती. तिच्या भारतीय फॅन्सना तर जास्तच आनंद झाला होता. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसुने सुद्धा सलमाच्या पोस्टवर कमेंट करत हे शानदार असल्याचं म्हटलं होतं. सलमासोबतच हॉलिवूडमधील अनेक स्टार्स हिंदू देवी-देवतांवर श्रद्धा ठेवतात. 
 

Web Title: Kangana Ranaut reacts on Hollywood actress Salma Hayek post about goddess Laxmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.