Join us

फरदीन खान-नताशा यांचा १८ वर्षांचा संसार मोडणार, मुलांचं शिक्षण ठरलं घटस्फोटामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:52 IST

फरदीन खान आणि नताशा माधवानी गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहतात.

बॉलिवूडमधीलघटस्फोटाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक जोड्या कित्येक वर्षांचा संसार मोडण्याचा निर्णय घेत आहेत. हृतिक-सुझैन, फरहान-अधुना, अरबाज-मलायका यांच्यानंतर आता अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) आणि नताशा माधवानी (Natasha Madhvani) सुद्धा घटस्फोटाच्या वाटेवर आहेत. दोघांचा १८ वर्षांचा संसार संपुष्टात येणार आहे. त्यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला यामागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

फरदीन खान आणि नताशा माधवानी गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहतात. फरदीन मुंबईत तर नताशा मुलांसोबत लंडनमध्ये आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दरम्यान फरदीन आणि नताशा यांच्यात असे काही मतभेद झाले ज्यामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एका जवळच्या मित्राने झूम टीव्हीला सांगितले की, 'फरदीन आणि नताशा यांच्यात मुलांच्या शिक्षणावरुन मतभेद व्हायचे. दोन्ही मुलांचं शिक्षण मुंबईत व्हावं अशी फरदीनची इच्छा होती तर नताशाला मात्र त्यांनी दुबईत शिकावं असं वाटत होतं. त्यांच्यात एकमत झालंच नाही. त्यामुळे नताशा लंडनमध्येच थांबली तर फरदीन मुंबईत परतला.'

2009 साली वडील फिरोज खान यांच्या निधनानंतर फरदीन लंडनला स्थायिक झाला होता. त्याच्या दोन्ही मुलांचा जन्मही तिथेच झाला. दोघंही एकमेकांच्या संपर्कात असतात आणि त्यांच्यात मुलांवरुनच चर्चा होत असते. फरदीन खान बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारित आहे. १२ वर्षांच्या ब्रेकनंतर तो संजय गुप्तांच्या 'विस्पुट' या सिनेमात रितेश देशमुखसोबत झळकणार आहे. तसंच संजय लीला भन्साळींच्या आगामी 'हीरामंडी' वेबसिरीजमध्येही त्याची वर्णी लागली आहे.

टॅग्स :फरदीन खानबॉलिवूडघटस्फोटशिक्षणलहान मुलं