Join us

स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 09:01 IST

भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

काल संपूर्ण देशाला नव्हे तर जगातील क्रिकेटप्रेमी भारतीयांना आनंद झाला. कारण काल भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. उत्कृष्ट फलंदाजी, जबरदस्त फिल्डिंग आणि कमाल बॉलिंगच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने 'क्रिकेट वर्ल्डकप २०२५'वर स्वतःचा ठसा उमटवून वर्ल्डकप मिळवला. अशातच भारताने वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड सेलिब्रिटींनी महिला क्रिकेट संघावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. 

बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छांचा पाऊस

  • अभिनेता सुनील शेट्टीने संघाचे अभिनंदन करताना लिहिले, "भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे! हा विजय केवळ क्रिकेटमधील नाही, तर प्रत्येक भारतीय महिलेच्या स्वप्नांना बळ देणारा आहे. तुम्हाला सलाम!"

  •  ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आनंद व्यक्त केला आणि भारतीय क्रिकेट संघाचं 'चॅम्पियन्स' म्हणून कौतुक केलं. आम्हाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दात बिग बींनी  भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रशंसा केली.

  • अभिनेता सनी देओलने महिला संघाचे अभिनंदन करताना लिहिले, "हिंदुस्तान जिंदाबाद! आज माझ्या बहिणींनी इतिहास रचला. भारतासाठी महिला क्रिकेटमध्ये पहिला विश्वचषक, काय कमाल केली! नारी शक्तीने तिरंग्याला उंच फडकवले आहे. हा विजय प्रत्येक भारतीयाचा विजय आहे."

  •  अभिनेत्री श्रद्धा कपूरने भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना म्हटलं की, ''अनेकदा वर्ष आई-बाबांकडून १९८३ च्या वेळी काय भावना होती हे ऐकत आलोय. कदाचित ही भावना आज आम्हाला जगायची असेल. मुलींनो खूप धन्यवाद. या पिढीत हा विजय महत्वाचा आहे.''

  • अभिनेत्री सोहा आली खानने लिहिलंय की,  "हे काही क्षण आहेत, जे इतिहासात आणि माझ्या आठवणीत कायमस्वरूपी कोरले जातील. आपल्या 'विमेन इन ब्लू'ने आपला पहिला विश्वचषक जिंकला आहे! हा किती अभिमानाचा क्षण आहे – किती चांगला सामना केला आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या सर्व तरुण मुलींसाठी ही किती प्रेरणादायी गोष्ट आहे! टीम इंडियाचे अभिनंदन. आणि तसेच दक्षिण आफ्रिका टीमनेही खूप चांगला सामना केला.. शेवटपर्यंत तुम्ही आम्हाला नखं खायला लावली!''

 भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिका संघाचा पराभव करून ही मोठी कामगिरी साधली. भारतीय महिला क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे देशातील महिला खेळाडूंना एक नवी दिशा मिळाली आहे. भारताची कॅप्टन हरमनप्रीत कौरने सुरेख कॅच घेत भारतीय संघाचा विश्वजषक विजयावर शिक्कामोर्तब केलं

English
हिंदी सारांश
Web Title : Bollywood Celebrates Indian Women's Cricket Team's World Cup Victory!

Web Summary : Bollywood stars congratulated the Indian women's cricket team for winning the 2025 World Cup. Celebrities like Sunil Shetty, Amitabh Bachchan, and others expressed their pride and joy on social media, hailing the victory as a monumental moment for Indian women in sports.
टॅग्स :भारतहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाअमिताभ बच्चनसुनील शेट्टीसनी देओलआयसीसी महिला विश्वचषक २०२५