'धुरंधर २'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून 'धुरंधर २' कधी रिलीज होतोय याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर सिनेमा रिलीज झाल्याची घोषणा होताच अॅडव्हान्स बुकींगमध्येच 'धुरंधर २' हाउसफुल्ल झाला. थिएटरमध्ये लोकांनी प्रचंड गर्दी केली. परंतु धुरंधर २' बद्दल एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, सिनेमा संपल्यावर प्रेक्षक थिएटरबाहेर लगेच उठून निघून जात आहेत. परंतु ही चूक केल्याने अनेक प्रेक्षकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. कारण 'धुरंधर २' संपल्यावर एक नव्हे तर दोन क्रेडिट सीन आहेत.
'धुरंधर २' मधील पोस्ट क्रेडिट सीन
अनेकजण 'धुरंधर २' संपल्यावर लगेच उठून निघून जात आहेत. फायनल चाप्टर संपल्यावर जसकीरत सिंग रांगीचा मिलिट्री प्रशिक्षणाचा पोस्ट क्रेडिट सीन दिसतो. तब्बल ५ मिनिटांचा हा पोस्ट क्रेडिट सीन पाहून प्रेक्षक थक्क होतात. हा सीन संपल्यावर पुन्हा शेवटचे क्रेडिट दिसतात. त्यामुळे प्रेक्षक थिएटरबाहेर उठून निघून जातात. परंतु इथेच सर्वजण मोठी चूक करतात. कारण 'धुरंधर २'मध्ये आणखी एक पोस्ट क्रेडिट सीन आहे. यात पाकिस्तानी अधिकारी आणि पाकिस्तानी पोलीस यांच्यात बाचाबाची होते.
पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या सांंगण्यावरुन पाकिस्तानी पोलिसांना हमजा अलीला जीवंत सोडून द्यावं लागतं. त्यामुळे पाकिस्तानी पोलीस चांगलाच भडकलेला दिसतो. परंतु पोलिसाच्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी त्याला निघून जायला सांगतो. हा छोटासा सीन 'धुरंधर २'मध्ये अगदी शेवटी दिसतो. जो अनेकांनी पाहिलाच नाही. त्यामुळे 'धुरंधर २' मध्ये दोन क्रेडिट सीन आहेत. त्यामुळे सिनेमा अगदी शेवटपर्यंत बघा. लगेच उठू नका. नाहीतर तुम्ही अगदी शेवटचा सीन मिस कराल.
Web Summary : Audiences are missing two post-credit scenes in 'Dhurandhar 2'. The first features military training. The second shows a heated exchange between Pakistani officials and police regarding a released suspect. Watch until the very end!
Web Summary : दर्शकों से 'धुरंधर 2' में दो पोस्ट-क्रेडिट दृश्य छूट रहे हैं। पहले दृश्य में सैन्य प्रशिक्षण है। दूसरे में पाकिस्तानी अधिकारियों और पुलिस के बीच गरमागरम बहस दिखाई गई है। अंत तक देखें!