Chhaava Collection Day 7: सध्या जगभरात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीच्या दिवशी सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. 'व्हॅलेंटाईन डे'ला या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. 'छावा' पाहून विकी कौशल (vicky kaushal),रश्मिका मंदाना यांच्याबरोबरच प्रेक्षक चित्रपटातील कलाकारांचे कौतुक करताना थकत नाहीत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. प्रदर्शनाच्या तारखेपासून छावा बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचत आहे. पहिल्याच दिवशी 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने बजेटची रक्कम वसूल केली असून आठवडाभरात २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
विकीसाठी 'छावा' हा त्याच्या आजवरच्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी त्याच्या 'उरी' सिनेमाने अशाप्रकारे दमदार कमाई केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपटाने पहिल्याच सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर १९७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चित्रपटाने सातव्या दिवशी १७.६१ कोटी कमावले आहेत. यामुळे सिनेमाचं भारतातील एकूण कलेक्शन २१५.३६ कोटींच्या घरात गेलं आहे. दरम्यान, ही आकडेवारी ही प्रारंभिक आहे, त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 'छावा' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ५ लाख तिकीट विकले गेले होते. यातूनच १३.७० कोटी कमाई झाली होती. सिनेमाचं बजेट १३० कोटी आहे. २०२५ वर्षाची 'छावा'ने बॉलिवूडला दमदार सुरुवात करुन दिली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलं असून सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांचीही भूमिका आहे. मॅडॉक फिल्म्स बॅनरअंतर्गत दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.