Join us

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकानंतर आता अर्जुनची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाला, 'पश्चातापापेक्षा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 15:41 IST

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकानंतर अर्जुनही पोस्टमधून सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे.

अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे बी टाऊनमधलं सर्वात चर्चेतलं कपल सध्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीला मलायका गायब होती. इतकंय काय तर तिने सोशल मीडियावरही त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत. यामुळे दोघांचं ब्रेकअप झालंय अशीच सर्वांना खात्री पटली. मलायकाने अर्जुनच्या वाढदिवशीच क्रिप्टिक पोस्ट शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता पहिल्यांदाच अर्जुननेही सूचक पोस्ट शेअर केली आहे.

अर्जुनने काय पोस्ट केली?

अर्जुनने कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये लिहिले आहे की, 'पश्चात्तापातील वेदनेपेक्षा शिस्तीमुळे होणारी वेदना बरी'. अर्जुनला या पोस्टमधून नक्की काय म्हणायचंय, त्याला नेमका कशाचा पश्चाताप झालाय याचा चाहते अंदाज लावत आहेत. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकानंतर अर्जुनही पोस्टमधून सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे.

अर्जुन कपूरच्या वाढदिवशीच मलायकाची एक शॉकिंग पोस्ट होती. त्यात लिहिले होते की, 'मला असे लोक आवडतात ज्यांच्यावर मी डोळे मिटून आणि माझी त्यांच्याकडे पाठ असतानाही विश्वास ठेवू शकते'. मलायकाच्या या पोस्टनंतर अर्जुनने तिचा विश्वासघात केल्याची चर्चा रंगली होती. 

मलायका आणि अर्जुन २०१८ पासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायकाने अरबाजला घटस्फोट दिल्यानंतर काही वर्षांनी अर्जुन तिच्या आयुष्यात आला. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. तसंच नेटकऱ्यांनी नेहमीच या कपलला ट्रोल केलं आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोराबॉलिवूडसोशल मीडियारिलेशनशिप