Join us

मलायका अरोरासोबत लग्नाच्या प्रश्नावर अर्जुन कपूरने दिली हिंट, कॉफी विद करणमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 15:40 IST

करणने लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नावर अर्जुन कपूरने उत्तर दिलं आहे.

लोकप्रिय शो 'कॉफी विद करण' (Koffee With Karan 8) सिझन ८ मध्ये नुकतंच अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) हजेरी लावली. तो यावेळी अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत (Aditya Roy Kapoor) आला होता. सध्या अर्जुन आणि आदित्य दोघांचीही लव्ह लाईफ चर्चेत आहे. अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे तर आदित्य रॉय कपूरचं नव्यानेच अनन्या पांडेसोबत अफेअर सुरु झालं आहे. दरम्यान करणने लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नावर अर्जुन कपूरने उत्तर दिलं आहे.

'कॉफी विद करण'च्या 8 व्या एपिसोडमध्ये करणने ट्रोलर्सच्या मुद्द्यावर चर्चा केली. १२ वर्षांनी मोठ्या मलायकासोबत अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आहे. ते नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. याचा कसा सामना करतो असा प्रश्न अर्जुनला विचारला असता तो म्हणाला,'असा कोणताच माणूस नाही ज्याच्यावर ट्रोलिंगचा परिणाम होत नाही. तुम्हाला याचा सामना करावाच लागतो. हो लोक केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलिंग करतात. या सर्व रँडम कमेंट्स असतात.'

रिलेशनशिपवर याचा परिणाम होतो का? यावर उत्तर देताना त्याने लग्नाविषयीचीही हिंट दिली. तो म्हणाला,'या शोमध्ये मला खरं सांगायचं आहे पण आपला पार्टनर इथे नसताना आमच्या भविष्याविषयी बोलणं योग्य नाही. जेव्हा आम्ही त्या स्टेजपर्यंत पोहचू तेव्हा त्यावर एकमेकांशी चर्चा करु. सध्या मी रिलेशनशिपमध्ये जिथे आहे तिथे खूप खूश आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी आम्ही खूप स्ट्रगल केले आहे. सध्या मला याबद्दल जास्त बोलायचं नाही कारण एकट्याने बोलणं योग्य नाही.'

टॅग्स :करण जोहरमलायका अरोरालग्नरिलेशनशिपबॉलिवूडअर्जुन कपूर