Join us

Anushka-Vamika : अनुष्का आणि वामिकाची कलाकृती पाहिलीत का? पाटीवर रेखाटलं चित्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 15:59 IST

अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka  Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची जोडी ही फार लोकप्रिय आहे. ते दोघं अनेकांसाठी आयडियल कपल आहेत. अनुष्का शर्मा गेल्या काही काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. पण, ती सोशल मीडियावर सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अनुष्का शर्मा दिसते. यातच अनुष्काने एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

अनुष्का शर्मा सध्या आपली लेक वामिकासोबत वेळ घालवत असल्याचं दिसून आलं आहे. अनुष्काने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पाटीवर चित्र रेखाटलेलं दिसून येत आहे. पाटीच्या एका बाजूला अनुष्काने फुलं काढली आहेत. तर दुसऱ्या बाजूला वामिका हिने अनुष्काने काढलेलं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. हा गोड फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनुष्काने शेअर केलेला हा फोटो व्हायरल होत आहे. 

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना आपलं आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं. विशेष प्रसंग वगळता दोघेही  वैयक्तिक आयुष्यातील झलक सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. काही दिवसांपुर्वीच या जोडीला मुलगा झाला आहे. अनुष्काची प्रसुतीदेखील लंडनमध्ये झाली. त्यांनी आपल्या लाडक्या लेकाचं नाव 'अकाय' असं ठेवलं आहे. विराट अनुष्काला 'वामिका' आणि 'अकाय' दोघांनाही कॅमेऱ्यापासून दूर ठेवणं पसंत करतात. आपल्या मुलांना त्यांच्या बालपणाचा आनंद घेता यावा यासाठी त्यांनी अद्याप 'अकाय' आणि 'वामिका'चा चेहरा मीडियाला दाखवलेला नाही. 

अनुष्का शर्मा ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. अनुष्का शर्मा हिचे चाहते तिच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. पण, लवकरच ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.  अनुष्का 'चकदा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची घोषणा काही वर्षांपूर्वीच झाली असून शूटिंगही पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. अनुष्का ही शेवटची 'झिरो' चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती. गेल्या वर्षी तिनं 'काला'मध्ये छोटी भूमिका साकारली होती.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमासोशल मीडियाइन्स्टाग्राम