Bhoot Bangla Box Office Collection Day 6 : हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट करणार्या कलावंतांमध्ये सध्या आघाडीवर असणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार.सध्या 'भूत बंगला'या हॉरर कॉमेडी चित्रपटामुळे अक्षय चर्चेत आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केलाय. दरम्यान, या सिनेमातअक्षय कुमारसहतब्बू, अभिनेते असरानी, वामिका गब्बी, परेश रावल, मिथिला पालकर, राजपाल यादव असे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगचा धुरंधर हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं.या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. त्यामुळे या कालावधीत प्रदर्शित झालेल्य़ा चित्रपटांना फार कमी प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं. मात्र,असं असूनही भूत बंगला सिनेमाच्या प्रदर्शनानंतर हे चित्र बदलल्याचं दिसतंय. अक्षय कुमारचा भूत बंगला सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असून आता धुरंधर-२ ची जादू ओसरल्याचं पाहायला मिळतं.
अक्षय कुमारच्या सिनेमाने सहा दिवसांत किती कमावले?
प्रदर्शनानंतरच्या सहा दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे रिलीजच्या पहिल्याच दिवशी भूत बंगला सिनेमाचे ११,६८२ शोज होते. ज्याचा सिनेमाचा चांगला फायदा झाला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिनेमाने काल बुधवारी ६.१५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यासह सिनेमाचं एकूण कलेक्शन ७८.०६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. त्यामुळे लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : Akshay Kumar's 'Bhoot Bangla' performs well, challenging 'Dhurandhar 2' at the box office. The horror-comedy has earned ₹78.06 crore in six days and is expected to soon enter the 100 crore club.
Web Summary : अक्षय कुमार की 'भूत बंगला' बॉक्स ऑफिस पर 'धुरंधर 2' को टक्कर दे रही है। हॉरर-कॉमेडी ने छह दिनों में ₹78.06 करोड़ कमाए और जल्द ही 100 करोड़ के क्लब में शामिल होने की उम्मीद है।