Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगाल झाल्याच्या बातम्यांवर आदित्यची प्रतिक्रिया; म्हणाला - माझे सासू-सासरे काय विचार करत असतील?

By अमित इंगोले | Updated: October 16, 2020 11:33 IST

आदित्य लॉकडाऊन दरम्यान कंगाल झालाय आणि त्याच्या अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रूपये शिल्लक राहिले आहेत. आता स्वत: आदित्यने या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

गायक आदित्य नारायण गेल्या काही दिवसांपासून गर्लफ्रेन्ड श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार असल्याने चांगलाच चर्चेत आहे. तसेच नुकतीच बातमी आली होती की, आदित्य लॉकडाऊन दरम्यान कंगाल झालाय आणि त्याच्या अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रूपये शिल्लक राहिले आहेत. आता स्वत: आदित्यने या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. एका मुलाखतीत आदित्यच्या हवाल्याने सांगण्यात आले होते की, लॉकडाऊनमुळे त्याला काम मिळत नाहीये आणि या वाईट काळात तो कंगाल झाला आहे. रिपोर्टमध्ये असेही देण्यात आले होते की, त्याने त्याचं सेव्हिंग्स आणि म्युच्युअल फंडातील पैसेही लॉकडाऊन दरम्यान काढले होते. 

आता दुसऱ्या एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदित्यने त्याचे सेव्हिंग्स संपण्याच्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. तो म्हणाला की, 'मी सामान्यपणे असं म्हणालो होतो की, मी एक नवीन घर लॉकडाऊनच्याआधी खरेदी केलं आहे. त्यामुळे मला माझ्या EMI बाबत विचार करावा लागेल. जर ही महामारी अशीच जास्त काळ सुरू राहिली तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल'. (आर्थिक संकटात असलेल्या आदित्य नारायणच्या 'त्या' ट्विटबाबत वडिल उदित नारायण यांचा मोठा खुलासा, पुन्हा वेधले लक्ष)

आदित्य म्हणाला की, 'मी सामान्यपणे म्हणालो होतो की, माझे घराच्या EMI चे ५ लाख रूपये कट झाले आणि माझ्याकडे आता १८ हजार रूपये शिल्लक आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही की, माझं दिवाळं निघालंय आणि माझ्याकडे आता काहीच पैसे नाहीत'.

तो म्हणाला की, 'दोन दशकांपेक्षाही जास्त काळ काम करत असल्याने आणि तेही सतत काम करत असल्याने मी कंगाल कसा होऊ शकतो?'. आदित्य गमतीने म्हणाला की, काय माहीत माझे होणारे सासू-सासरे काय विचार करत असतील. आता तर मला लग्नात जास्त गिफ्टही मिळणार नाहीत. (नेहा कक्करपाठोपाठ आदित्य नारायणनेही दिली प्रेमाची कबुली; या अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ)

आदित्यने त्याच्या फॅन्सना अपील केली आहे की, त्यांनी त्याचं आधी केलेलं काम बघावं आणि अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आदित्य हा सोशल मीडियावर सतत अॅक्टिव असतो आणि आपल्या कामांबाबत माहिती देत असतो. 

टॅग्स :आदित्य नारायणबॉलिवूडटेलिव्हिजन