मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा (AQI) स्तर दिवसेंदिवस खालावत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने या गंभीर समस्येवर आवाज उठवला आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक, विशेषतः लहान मुले 'गुदमरत' असल्याचे सांगत तिने प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे.
दीपिकाची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत
गुरुवारी मुंबईतील हवेचा निर्देशांक (AQI) १५० च्या वर गेल्याचे दिसून आले. हा AQI आरोग्यासाठी हानीकारक असतो. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुंबईच्या प्रदूषणाचा नकाशा शेअर केला. यात तिने लिहिले की, "हे शहर आणि इथे राहणारी लहान मुलं गुदमरत आहे! हे कितपत योग्य आहे?" यासोबतच तिने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबईच्या आरोग्य विभागाला टॅग करत त्यांचं याकडे लक्ष वेधलं आहे. दीपिका स्वतः एक आई असल्याने तिने मुलांच्या आरोग्याबाबत विशेष चिंता व्यक्त केली आहे.
केवळ दीपिकाच नाही, तर यापूर्वी सयामी खेर आणि रिचा चड्ढा यांसारख्या अभिनेत्रींनीही मुंबईच्या ढासळत्या हवेच्या गुणवत्तेबद्दल संताप व्यक्त केला होता. सयामी खेरने तर "हवेतील प्रदूषण जीवघेणं आहे" असे भाष्य करत घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. दीपिका पादुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती शेवटची 'सिंघम अगेन' मध्ये दिसली होती. सध्या ती शाहरुख खानसोबतच्या 'किंग' आणि साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबतच्या 'AA22' या चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे.
Web Summary : Deepika Padukone voices concern over Mumbai's worsening air quality, especially its impact on children. She urged BMC to take immediate action, joining other actresses highlighting the issue. She is currently working on upcoming films.
Web Summary : मुंबई की हवा की गुणवत्ता बिगड़ने पर दीपिका पादुकोण ने चिंता जताई, खासकर बच्चों पर इसके प्रभाव को लेकर। उन्होंने बीएमसी से तत्काल कार्रवाई करने का आग्रह किया, अन्य अभिनेत्रियों के साथ मिलकर इस मुद्दे पर प्रकाश डाला। दीपिका जल्द ही फिल्मों में दिखेंगी।