Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरुण धवनला 'बॉर्डर २' च्या शूटिंगवेळी झालेली गंभीर दुखापत, चालताही येत नव्हतं! काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:52 IST

"इतक्या भयानक वेदना...", बॉर्डर २ च्या शूटिंगदरम्यान वरुण धवनला झालेली गंभीर दुखापत, चाहत्यांना माहिती देत म्हणाला...

Varun Dhawan Share Video: जवळपास २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ हा सिनेमा बराच गाजला होता. त्यातील गाणीही लोकप्रिय झाली होती. देशभक्तीपर असलेल्या या सिनेमाच्या सिक्वेल नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला हा बॉर्डर २ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.या चित्रपटाने अवघ्या ७ दिवसांत २०० कोटींपेक्षा जास्त कमाई करत विक्रम रचला आहे.याचदरम्यान, वरुण धवनने शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

वरुण धवनने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर बॉर्डर २ च्या शूटिंगचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. चित्रपटात अॅक्शन सीन शूट करत असताना एका चुकीमुळे अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली. इन्स्टाग्रामवर त्या सीनचा व्हिडीओ शेअर करत वरुणने घटनाक्रम सांगितला. त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये चाहत्यांना माहिती देत म्हटलंय, 'बॉर्डर २' च्या शूटिंग दरम्यान मला गंभीर दुखापत झाली. कॅमेरा डॅमेज होऊ नये म्हणून मी प्रयत्न करत होतो पण तेव्हा दगडावर आदळलो. पाठीच्या कण्याला दुखापत झाली.मला यापूर्वी कधीही इतक्या भयानक वेदना जाणवल्या नव्हत्या."

आता कशी आहे अभिनेत्याची तब्ब्येत 

त्यानंतर पुढे वरुण त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती देत म्हणाला,  "माझ्या पाठीच्या कण्याचं हाड फ्रॅक्चर झालं आहे.अजूनही मी पूर्णपणे बरा झालेलो नाही.त्या दिवशी मला चालताही येत नव्हतं, पण मी काम करत राहिलो, माझ्या टीमने मला खूप मदत केली.यासाठी मी खूप आभारी आहे." 

भारतीय सैन्याची शौर्यगाथा सांगणारा आणि प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारा 'बॉर्डर २' हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. दिग्दर्शक अनुराग सिंग यांच्या बॉर्डर २ सिनेमाची विक्रमाच्या दिशेने  घौडदौड सुरु असून पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने  २२४.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने सातव्या दिवशी, म्हणजे मंगळवारी बॉक्स ऑफिसवर ११.२५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Varun Dhawan Injured on 'Border 2' Set, Could Not Walk!

Web Summary : Varun Dhawan sustained a serious back injury during 'Border 2' filming. He shared a video revealing he fractured his spine and couldn't walk. Despite the pain, he continued working with his team's support. The film is performing well.
टॅग्स :वरूण धवनसीमारेषासनी देओलदिलजीत दोसांझअहान शेट्टीबॉलिवूडसिनेमासोशल मीडिया