Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात? पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 15:00 IST

अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. 

बॉलिवूडमध्ये वेडिंग सीझन पुन्हा सुरु झाले आहे.  अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यंदा लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे  अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लवकरच आपला बायफ्रेंड जॅकी भगनानीसोबत लग्न करणार आहे. अभिनेत्रीच्या घरी प्री-वेडिंग पंक्शनला सुरुवात झाली आहे. आता यातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. 

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तिच्या एका पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे.  श्रद्धानं चाहत्यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला आहे.  श्रद्धा कपूरने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करून श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले, "मी छान दिसत आहे ना, मी लग्न करावं का?". तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

श्रद्धा ही मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री आहे. तिनं आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. ती  नुकतीच 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात दिसली. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे. शिवाय, राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'स्त्री २' ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

टॅग्स :श्रद्धा कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमासोशल मीडियालग्न