Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य नारायणच्या रिसेप्शनमध्ये डान्स करताना दिसले भारती-हर्ष, व्हिडीओ व्हायरल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 13:21 IST

भारती या पार्टीमध्ये व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. तर हर्ष लिंबाचिया डार्क ब्लू कलरच्या सूटमध्ये दिसला. दोघेही पार्टीत चांगलेच आनंदी दिसले.

कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया नुकतेच आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दिसले. योगायोगाने आजच(गुरूवारी) त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. भारती या पार्टीमध्ये व्हाइट कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. तर हर्ष लिंबाचिया डार्क ब्लू कलरच्या सूटमध्ये दिसला. दोघेही पार्टीत चांगलेच आनंदी दिसले.

हर्ष आणि भारती रिसेप्शन पार्टीत आपल्या फॅन्सच्या गराड्यात दिसले. त्यांचे फॅन्स आणि पार्टीतील पाहुण्यांसोबत ते दोघेही फोटो काढताना दिसले. ड्रग्स प्रकरणी तुरूंगातून बाहेर आल्यावर ते पहिल्यांदाच अशाप्रकारे एखाद्या कार्यक्रमात दिसेल.

दरम्यान, एनसीबीने दोघांच्या घरी धाड टाकली असता तिथे त्यांना ८६.५ ग्रॅम गांजा सापडला होता. ज्यानंतर दोघांनाही अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. काही दिवसातच त्यांना जामीन मिळाला होता. ज्यात एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांनी मदत केल्याचेही समोर आले होते. नंतर त्यांना सस्पेंड करण्यात आले. 

दरम्यान, आदित्य आणि श्वेताने १ डिसेंबरला इस्कॉन मंदिरात विवाह केला. लग्नात आणि रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. ज्यात अनेक मोठे चेहरेही होते. गोविंदाही परिवारासह या पार्टीत पोहोचला होता. तसेच या रिसेप्शन पार्टीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :भारती सिंगआदित्य नारायणलग्नटेलिव्हिजनबॉलिवूड