उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर

By चेतनकुमार धनुरे | Published: June 6, 2024 08:03 PM2024-06-06T20:03:17+5:302024-06-06T20:03:47+5:30

एक मंत्री, चार आमदार असूनही आघाडीला मताधिक्य

Due to the great lead of Maha Aghadi in Osmanabad Lok Sabha, the indicator of the MLAs of Maha Yuti rose | उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर

उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभेत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी ही चकित करणारी ठरली आहे. उद्धवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांना सर्वच सहाही विधानसभा क्षेत्रातून भरघोस लीड मतदारांनी दिली. विशेष म्हणजे, महायुतीतील एक मंत्री व चार आमदार असताना आघाडीला मिळालेल्या मताधिक्याने त्यांचे इंडिकेटर लागले आहेत.

नजीकच्या काळात राज्यात घडलेल्या राजकीय स्थित्यंतरांचे पडसाद लोकसभा निवडणुकीतून ठळकपणे उमटली. यामुळे ही निवडणूक आगामी विधानसभेची लिटमस टेस्टच ठरली. सततच्या अस्मानी संकटाने होणारे शेतमालाचे नुकसान अन् त्यानंतर पडणारे दर, पक्षांतील ताटातूट, मराठा आरक्षण, द्वेषपूर्ण वक्तव्ये, या काही प्रमुख कारणांचा रोष महायुतीला उस्मानाबाद मतदारसंघात झेलावा लागला. येथून महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे ३ लाख २९ हजार ८४६ मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे हे मताधिक्य ठरले आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातून आघाडीला मिळालेली लीड पाहिल्यास निश्चितच या आमदारांची झोप उडवणारी ठरली आहे.

महायुतीच्या मतदारसंघातून आघाडीला लीड...
१. औसा विधानसभा (भाजप) : या मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार हे आमदार आहेत. त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना ३४ हजार ९६६ मतांची लीड मिळाली आहे.
२. उमरगा विधानसभा (शिंदेसेना) : येथून शिंदेसेनेचे ज्ञानराज चौगुले हे तीन टर्म आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातून विरोधी आघाडीला ४३ हजार ९४४ मतांची लीड आहे.
३. तुळजापूर (भाजप) : या मतदारसंघातून माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील हे आमदार आहेत. महायुतीच्या उमेदवारांचे ते पतीही आहेत. त्यांच्या मतदारसंघातून विरोधी उमेदवारास ५२ हजार १७६ मतांची लीड आहे.
४. परंडा (शिंदेसेना) : येथील आमदार तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्रीही आहेत. त्यांच्या मतदारसंघातून विरोधी उमेदवार राजेनिंबाळकरांना सर्वाधिक ८१ हजार १७७ मतांची लीड प्राप्त झाली.
५. बार्शी (अपक्ष-भाजप समर्थित) : येथून राजेंद्र राऊत हे अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, त्यांनी भाजपला समर्थन दिले आहे. त्यांच्या मतदारसंघातून राजेनिंबाळकरांना ५४ हजार २१२ मतांची लीड मिळाली.

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
विधानसभा ओम राजेनिंबाळकर (उद्धवसेना) अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार)

औसा १०२२४८                         ६७२८२
उमरगा १०६६६९                         ६२७२५
तुळजापूर १३८७९१                         ८६७१५
उस्मानाबाद १३७१५८                         ७६७३५
परंडा            १३३८४८                         ५२६७१
बार्शी             १२४८८३                         ७०६७१

Web Title: Due to the great lead of Maha Aghadi in Osmanabad Lok Sabha, the indicator of the MLAs of Maha Yuti rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.