जामनेर हळहळले! जिवावर उदार होऊन बुडत असलेल्या मुलाला वाचविले, पण स्वत:चा जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 16:03 IST2022-09-09T16:02:23+5:302022-09-09T16:03:42+5:30
गणपती विसर्जनावेळी जामनेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे.

जामनेर हळहळले! जिवावर उदार होऊन बुडत असलेल्या मुलाला वाचविले, पण स्वत:चा जीव गमावला
- मोहन सारस्वत
जामनेर जि. जळगाव : गणपती विसर्जनावेळी जामनेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून तरुणाने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मुलाला वाचविले, परंतू स्वत:चा जीव मात्र तो वाचवू शकला नाही. या घटनेने सारे जामनेर हळहळले आहे.
किशोर राजु माळी (२७, रा.गणेशवाडी, जामनेर) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. कांग नदीच्या पुलाखाली गणपतींचे विसर्जन सुरु होते. यावेळी किशोरला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना दिसला, त्याला वाचविण्यासाठी किशोरने पाण्यात उडी मारली. त्या मुलाला त्याने वाचविले. परंतू, किशोरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
किशोरचा मृतदेह उपजिल्हारुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी पत्नी व मुलांनी एकच आक्रोश केला. कांग नदी पात्रातून त्याचा मृतदेह काढण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती