गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 19:31 IST2019-09-10T19:30:46+5:302019-09-10T19:31:28+5:30
गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली...

गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला बेदम मारहाण
पिंपरी : गणपती पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाला तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंपापजवळ घडली. विजय मधुकर आठवले (वय २८, रा. गणेश खिंड रोड, खैरेवाडी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन शेलार (रा. पुणे) आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय रविवारी रात्री सांगवी परिसरात गणपती पाहण्यासाठी गेले. जुनी सांगवी येथील गणपती पाहत असताना ते शितोळे पेट्रोल पंपाजवळ आले असता तीन आरोपींनी त्यांना अडवले. आरोपी रोहन याने हातातील लोखंडी कड्याने विजय यांच्या तोंडवर मारले यामध्ये विजय जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.