अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप, ५० हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:17 IST2023-08-31T14:17:01+5:302023-08-31T14:17:25+5:30
उरण तालुक्यात घडला होता किळसवाणा प्रकार, १३ वर्षीय मुलीला दिली होती जीवे मारण्याची धमकी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप, ५० हजारांचा दंड
उरण : तालुक्यातील डाऊरनगर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणाऱ्या आरोपी रमेश कालेल (२२) याला पनवेल अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सहिदा शेख यांनी खटल्याच्या अंतिम सुनावणीनंतर जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
डाऊरनगर येथील चाळीत राहणाऱ्या आरोपीने २९ नोव्हेंबर २०१८ रोज भरदुपारी १३ वर्षीय मुलीला आरोपीने त्याचे घरी बोलावून घेऊन, घराचा दरवाजा बंद करून मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार मुलीस घरात डांबून ठेवल्या बाबतची तक्रार उरण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.याप्रकरणी पोलिसांनी पोस्को आणि इतर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्यातील परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुरव्यांसह,साक्षीदार यांच्याकडे तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे गोळा करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप सादर केले होते. अंतिम सुनावणीनंतर आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.