...अन् गर्दीत सापडला खाकीतला देव; मोठी दुर्घटना टळली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 01:50 PM2019-08-12T13:50:20+5:302019-08-12T13:54:47+5:30

पोलिसांमुळे टळली मोठी दुर्घटना

Police officer saved young girl's life, found god in khaki uniform | ...अन् गर्दीत सापडला खाकीतला देव; मोठी दुर्घटना टळली!

...अन् गर्दीत सापडला खाकीतला देव; मोठी दुर्घटना टळली!

Next
ठळक मुद्देख़ाकीतला खरा देव सापडल्याचे या मुलीचे म्हणणे आहे. गर्दीत ५३ मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत़. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ निरिक्षकांसह कर्मचाऱ्याने हातात लाठी घेत, गर्दीला सावरण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - चिंतामणीच्या आगमन सोहळ्यासाठी रात्रीपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली. त्यात, शंभरावे वर्ष असल्याने दुपारपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविक तेथे धडकले. धक्काबुकी वाढली. यात, भुरळ येवून पडलेल्या चार मुलींना काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय बसवत यांनी स्वत: उचलून त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे मोठी दुर्घटना टळली.
जवळपास अडीचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. गर्दीतील रोडरोमियो, पाकिटमार, टवाळखोरांमध्ये, फोटोसाठी धडपडणाऱ्यांमुळे धक्काबुकी झाली. मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ निरिक्षकांसह कर्मचाऱ्याने हातात लाठी घेत, गर्दीला सावरण्याचा प्रयत्न केला.
चेंगराचेंगरी थांबविण्यास पोलिसांना यश आले. यात झालेल्या धक्काबुकीत काही जण किरकोळ जखमी झाले. मोठी दुर्घटनाटळली. याच दरम्यान भुरळ येवून खाली पडलेल्या मुलींकडे बसवत यांचे लक्ष गेले. त्यांनी स्वत: मुलींना उचलून त्यांची रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. अशाप्रकारे चार मुलींना त्यांनी रुग्णालयात सुखरुप पोहचवले. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे ४ मुलांना सुखरूप गर्दीतून बाहेर काढण्यात आले तर ६ मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मोठी दुर्घटना टळली
याच दरम्यान भुरळ येवून खाली पडलेल्या मुलीकडे बसवत यांचे लक्ष गेले. जबरदस्त गर्दी असल्याने गर्दीचा लोंढा त्या मुलीवर येण्याआधीच काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांनी तिला पकड़ले. त्यात गर्दी आणख़ीनच त्यांच्या अंगावर आली. याच दरम्यान मुलीने बसवत यांना घट्ट पकड़ले. मुलीला गळ्याशी कवटाळत, हातातल्या काठीने गर्दी सावरत त्यांनी त्या मुलीला गाड़ीकड़े आणले. अन्य कर्मचाऱ्याचे बसवतकड़े लक्ष जाताच त्यांनी त्यांच्याकड़े धाव घेतली. मुलीला केईएम रुग्णालयात वेळीच दाखल केले. ते पुढ़े गर्दित अशाच प्रकारे चार मुलींना त्यांनी रुग्णालयात सुखरुप पोहचवले. ख़ाकीतला खरा देव सापडल्याचे या मुलीचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत काळाचौकी पोलीस त्या मुलीच्या संपर्क़ात होते. 

५३ मोबाईल ग़ायब
गर्दीत ५३ मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या आहेत़. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.  

 

Web Title: Police officer saved young girl's life, found god in khaki uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.