‘काळ्या जादू’पायी सख्ख्या भावांची कुटुंबे झाली वैरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:55 AM2021-09-05T07:55:33+5:302021-09-05T07:56:06+5:30

चंद्रपुरात चौघांना मारहाण; सहा अटकेत

The families of the 'black magic' brothers became enemies pdc | ‘काळ्या जादू’पायी सख्ख्या भावांची कुटुंबे झाली वैरी

‘काळ्या जादू’पायी सख्ख्या भावांची कुटुंबे झाली वैरी

Next
ठळक मुद्दे आपल्यावर मोठ्या भावानेच काळी जादू केली म्हणूनच कर्करोग झाला असा संशय कुटुंबीयांना होता. यावरून दोन्ही कुटुंबात नेहमी वाद व्हायचा. घटनेची तक्रार शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात पूजा हिने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) येथे भानामती व नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जादूटोण्याच्या संशयावरून हातापाय बांधून अमानुष मारहाणीच्या घटनांनी समाजमन सुन्न झाले असताना आता हे ‘भूत’ चंद्रपुरातही शिरले आहे. शहरातील भिवापूर वाॅर्डातील पडदेमवार यांच्या कुटुंबातील चौघांना काळ्या जादूच्या संशयावरून बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
आरोपींना शनिवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. राम पडदेमवार व नारायण पडदेमवार हे दोघे भाऊ शेजारी राहतात. राम हे

कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त आहे. आपल्यावर मोठ्या भावानेच काळी जादू केली म्हणूनच कर्करोग झाला असा संशय कुटुंबीयांना होता. यावरून दोन्ही कुटुंबात नेहमी वाद व्हायचा. घटनेची तक्रार शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात पूजा हिने दिली.

जादूटोण्याच्या घटना
nशुक्रवारी मोठा भाऊ नारायण टपरीवर चहा पिण्यासाठी गेले असता, राम यांच्या कुटुंबीयांनी नारायण यांच्याशी वाद घातला व मारहाण सुरू केली. यावेळी वडिलांच्या बचावासाठी नारायण यांचा मुलगा आकाश, आरती व पूजा या दोन मुली धावून आल्या. त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.  पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायदा आदी कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: The families of the 'black magic' brothers became enemies pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app