मुंबई : भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात चांगली मैत्री आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे रोहितच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात चहलची उपस्थिती असतेच. रोहितची पत्नी रितिका सजदेह हिच्याशीही चहलची चांगलीच गट्टी आहे. सोशल मीडियावर रितिका आणि चहल एकमेकांची फिरकी घेण्याची एकही संधी सोडत नाही, असे अनेक किस्से घडलेही आहेत. पण, आता रितिकानं चक्क चहलचा फोटो कापला आहे आणि तसा दावा चहलनेच केला आहे. नेमके काय झाले, ते जाणून घेऊया...

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे. पण, चहल या ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियाच सदस्य नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चहल जास्तच अॅक्टीव्ह आहे. रितिकानं रविवारी इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. त्यात तिच्यासह रोहित आणि मुलगी समायरा दिसत आहे. त्या फोटोवर कमेंट करताना चहलने रितिकाला प्रश्न विचारला की,''वहिनी माझा फोटो क्रॉप का केला.'' त्यावर रितिकानेही सडेतोड उत्तर दिले. ती म्हणाली,'' तूझ्या कुलनेसमुळे आमच्याकडे कुणीच लक्ष दिले नसते.'' 

हिटमॅन रोहित परतफेड करणार; कॅप्टन कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार?
बंगळुरु येथे होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, तसे न झाल्यास पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला जाण्याची शक्यता नक्की आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा कॅप्टन विराट कोहलीच्या वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड बुधवारपर्यंत रोहितच्याच नावावर होता. आता यात कोण बाजी मारतो, हे सामना सुरू झाल्यावरच कळेल.

कोहलीनं ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. कोहलीच्या नावावर 2441 धावा आहेत, तर 2434 धावांसह रोहित आता दुसऱ्या स्थानी आहे. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ( 2283), पाकिस्तानचा शोएब मलिक (2263) आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम ( 2140) अव्वल पाचमध्ये आहेत. आता हा विक्रम पुन्हा नावावर करण्यासाठी रोहितला संधी आहे. रोहितला आजच्या सामन्यात 7 धावा कराव्या लागणार आहेत.
 

Web Title: Yuzvendra Chahal alleges he has been cropped out of photo, Ritika Sajdeh stumps him with hilarious reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.