Main Bhi Harjeet Singh : कर्तव्य बजावताना हात गमावलेल्या 'धाडसी' पोलिसाला Yuvraj Singh चा Salute!

काही दिवसांपूर्वी पंजाब पोलीस अधिकारी हरजीत सिंग यांना आपला हात गमवावा लागला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 10:45 AM2020-04-29T10:45:41+5:302020-04-29T10:46:30+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh paid tribute to Punjab cop Harjeet Singh, who had lost his hands after a brutal attack by a goon svg | Main Bhi Harjeet Singh : कर्तव्य बजावताना हात गमावलेल्या 'धाडसी' पोलिसाला Yuvraj Singh चा Salute!

Main Bhi Harjeet Singh : कर्तव्य बजावताना हात गमावलेल्या 'धाडसी' पोलिसाला Yuvraj Singh चा Salute!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी आज डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी आणि पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपल्या कुटुंबाची काळजी न करता ही सर्व मंडळी देशवासीयांसाठी झगडत आहेत. असे असताना त्यांना सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे, परंतु काही लोकांना तीही पार पाडता येत नाही. अशाच काही माथेफिरूंकडून पोलिसांवर हल्ला करणाऱ्याच्या घडना घडत आहेत. अशाच एका हल्ल्यात काही दिवसांपूर्वी पंजाब पोलीस अधिकारी हरजीत सिंग यांना आपला हात गमवावा लागला होता. भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगनं या धाडसी पोलिसाला कडक सॅल्यूट ठोकला आहे.

चंदीगड येथील पीजीआय हॉस्पिटलमध्ये हरजीत सिंग यांच्यावर यशस्वी उपचार केले गेले. उपचारानंतर हरजीत सिंग यांचा सॅल्यूट करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. कर्तव्य बजावताना काही माथेफिरूंनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात हरजीत सिंग यांना हात गमवावा लागला, तर अन्य सहकारी जखमी झाले होते. कोरोना व्हायरसच्या संकटात हरजीत सिंग हे सर्वांसाठी वीरतेचे प्रतिक बनले आहेत.

पंजाबमधील अनेक सेलिब्रेटी हरजीत सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहताना दिसत आहेत. आपलं आयुष्य संकटात घालून हे पोलीस सर्वांची रक्षा करत आहेत, त्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन सेलिब्रेटिंकडून करण्यात येत आहे. युवराज सिंगनेही मंगळवारी एक व्हिडीओ पोस्ट करून हरजीत सिंग यांना सलाम ठोकला आहे. युवी या व्हिडीओसह #MainBhiHarjeet Singh या चळवळीत सहभागी झाला आहे.  

युवी म्हणाला,''हरजीत सिंग यांचे धाडस आणि दृढनिश्चय देशातील अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. निःस्वार्थ सेवा करणाऱ्या या पोलिसांचे खुप खुप आभार. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.'' 


12 एप्रिलला पटियाला येथे नाकाबंदीच्या कामावर असताना पोलिसांवर हा हल्ला झाला. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. निहांग सिख यांनी तलवारीने हा हल्ला केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर या पोलिसांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  
 

... तर पाकिस्तानकडे वीरेंद्र सेहवागपेक्षाही स्फोटक फलंदाज असता; शोएब अख्तरचा अजब दावा

Web Title: Yuvraj Singh paid tribute to Punjab cop Harjeet Singh, who had lost his hands after a brutal attack by a goon svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.