रोहित शर्माची जागा घ्यायला 'हा' युवा सलामीवीर सज्ज, म्हणाला...

शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीवीर न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार नसल्यानं कसोटी मालिकेत सलामीला येण्याची संधी कोणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचं काम सुरू झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 04:44 PM2020-02-13T16:44:32+5:302020-02-13T16:45:35+5:30

whatsapp join usJoin us
The young opener ready to replace Rohit Sharma, said ... | रोहित शर्माची जागा घ्यायला 'हा' युवा सलामीवीर सज्ज, म्हणाला...

रोहित शर्माची जागा घ्यायला 'हा' युवा सलामीवीर सज्ज, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यासाठी रोहित शर्माची जागा घेण्यासाठी एक युवा सलामीवीर सज्ज झाला आहे.

शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीवीर न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार नसल्यानं कसोटी मालिकेत सलामीला येण्याची संधी कोणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचं काम सुरू झालं आहे. पृथ्वी शॉ आणि शुबमन गील यांच्यात दुसऱ्या सलामीवीराच्या जागेसाठी चुरस रंगणार आहे.

मयांक हा सलामीसाठी एक पर्याय असला तरी वन डे मालिकेत त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तीन सामन्यांत त्यानं 31, 3 आणि 1 धाव केली. मयांकसोबत कसोटीत डावाची सुरुवात करण्यासाठी पृथ्वी आणि शुबमन हे दोन पर्याय आहेत. पृथ्वीच्या नावावर दोन कसोटी सामने आहेत आणि त्यात त्यानं पदार्पणात शतकही झळकावले आहे. 2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो कसोटी सलामीला येण्यासाठी सज्ज होता. पण, त्याला दुखापतीमुळे त्या दौऱ्यातून माघारी फिरावे लागले. शुबमनचे कसोटी पदार्पण झालेले नाही, परंतु त्यानं भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना न्यूझीलंड अ विरुद्धच्या अनौपचारिक सामन्यांत 83, 204* आणि 136 धावा कुटल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या सराव सामन्यात मयांकसोबत कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भारतीय संघानं मागील सात कसोटी सामन्यांत विजय मिळवले आहेत. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया 360 गुणांसह सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सामोरे जाण्यापूर्वी टीम इंडियाचं मनोबल नक्कीच उंचावलेलं असेल. पण, दुखापतींचे सत्र संघाच्या मागे कायम असल्यानं कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत अंतिम अकरामध्ये कोणाला स्थान द्यावं, असा पेच निर्माण झाला आहे.

रोहित शर्मा की जगह लेने को तैयार <a href='https://www.lokmat.com/topics/shubhman-gill/'>शुभमन गिल</a>, कहा- पहली बार ओपनिंग नहीं करूंगा 

शुबमल सलामीबाबत म्हणाला की, " मी यापूर्वी भारताच्या युवा संघात खेळलो आहे. युवा संघातून खेळताना मी बऱ्याचदा सलामी केली आहे. त्यामुळे मला सलामीला खेळण्याची सवय आहे. त्यामुळे जर मला भारतीय संघाने सलामी करण्याची संधी दिली तर माझ्यावर दडपण नसेल."

Web Title: The young opener ready to replace Rohit Sharma, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.