Yashasvi Jaiswal Dancing Video, Indian fans angry, IND vs ENG 1st Test: यजमान इंग्लंडने लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पाच गडी राखून पराभव केला. सामन्यातील चौथ्या डावात इंग्लंडच्या संघाने विक्रमी ३७१ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. या सामन्यात भारताचे खराब क्षेत्ररक्षण हा मुद्दा पराभवानंतर विशेष चर्चेत आला. गचाळ क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत यशस्वी जैस्वाल याचे नाव सर्वात आघाडीवर राहिले. यशस्वी जैस्वालने तब्बल चार झेल सोडले. आपल्या हातून अशी चूक घडल्यानंतरही सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना यशस्वी जैस्वाल काही चाहत्यांसोबत नाच-गाणे करताना दिसला. त्यामुळे आता यशस्वी जैस्वालवर सोशल मीडियातून टीकेची जोड उठलेली दिसत आहे.
फलंदाजीत हिरो पण फिल्डिंगमध्ये झिरो
यशस्वी जैस्वालने पहिल्याच डावात दमदार शतक ठोकले. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. पण क्षेत्ररक्षण करताना त्याने अतिशय वाईट कामगिरी केली. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने एकूण तीन झेल सोडले. तसेच दुसऱ्या डावात भारताला एका दिवसाच्या खेळात १० बळींची गरज होती. अशावेळी शतकवीर बेन डकेट याचा ९७ धावांवर जैस्वालने कॅच सोडला. त्यानंतर डकेटने १४७ धावांची खेळी केली. पहिल्या डावातही हॅरी ब्रूक ६२ धावांवर खेळत असताना जैस्वालने त्याचा झेल सोडला. त्याने ९९ धावा केल्या. तसेच ओली पोप याचाही जैस्वालने कॅच सोडला. त्यानंतर पोपने १०६ धावांची खेळी केली.
यशस्वी जैस्वालच्या कृतीने चाहते नाराज
यशस्वी जैस्वाल सामीरेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याने केलेल्या एका कृतीमुळे तो टीकेचे लक्ष्य ठरला. सामन्याच्या पाचव्या दिवशी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना जैस्वाल काही काळ नाच गाणे करताना दिसला. सोशल मीडियावर त्याच्या या कृतीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना आणि आपल्या हातून चार झेल सुटलेले असताना यशस्वी जैस्वालची अशी कृती चाहत्यांना अजिबात आवडलेली नाही. कारण जैस्वालच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारताचा पराभव झाला.
पराभवानंतर बोलताना कर्णधार शुबमन गिल म्हणाला, "आमच्याकडे झटपट विकेट घेण्याची संधी होती. पण, ते होऊ शकले नाही. आमच्याकडून काही चुका झाल्या. आम्हाला पुढे जाऊन त्यात सुधारणा करावी लागेल."
Web Title: Yashasvi Jaiswal Slammed By Netizens As Opener Spotted Dancing While Fielding After 3 Dropped Catches In ENG vs IND 1st Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.