WTC Final 2021 IND vs NZ : रिषभ पंतची प्रकृती बिघडली, त्यानं ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धाव घेतली; वृद्धीमान सहा करतोय किपिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:53 PM2021-06-23T21:53:22+5:302021-06-23T21:54:40+5:30

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे.

WTC final 2021 Ind vs NZ Test : Wriddhiman Saha  is keeping for India as Rishabh Pant is unwell | WTC Final 2021 IND vs NZ : रिषभ पंतची प्रकृती बिघडली, त्यानं ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धाव घेतली; वृद्धीमान सहा करतोय किपिंग!

WTC Final 2021 IND vs NZ : रिषभ पंतची प्रकृती बिघडली, त्यानं ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धाव घेतली; वृद्धीमान सहा करतोय किपिंग!

Next

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे. भारतानं विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना किवींचे दोन्ही सलामीवीर ४४ धावांवर माघारी परतले. पण, केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं किवींचा डाव सावरला आहे, अशात भारताची चिंता वाढवणारं प्रसंग घडला. रिषभ पंत यानं प्रकृती बिघडल्यामुळे ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धाव घेतली आणि त्याच्या जागी वृद्धीमान सहा किपिंगला आला आहे. ( Wriddhiman Saha is keeping for India as Rishabh Pant is unwell.) 


न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या सहाव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारताचे तगडे फलंदाज माघारी परतले. त्यानंतर रिषभ पंत वगळता तळाच्या फलंदाजांनाही अपयश आलं अन् टीम इंडियाचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. टीम साऊदीला चार, ट्रेंट बोल्टला ३ व कायले जेमिन्सनला २ विकेट्स आणि निल वॅगनरनं एक विकेट घेतली.  कोहली ( १३), पुजारा ( १५) आणि रहाणे ( १५) माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०९ अशी केली. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु निल वॅगनरनं ही जोडी तोडली. त्यानंतर ट्रेंट बोल्टनं एकाच षटकात रिषभ व आर अश्विनला बाद केले. बघता बघता भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला.WTC Final 2021, WTC Final 2021

टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. आर अश्विननं सारा गेम पलटवला. त्यानं दोन्ही सलामीवीरांना ४४ धावांवर माघारी पाठवले. कर्णधार केन विलियम्सनलाही त्यानं पायचीत पकडले होते, परंतु DRSनंतर केन नाबाद असल्याचा निर्णय देण्यात आला. विराटच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ७१ विकेट्सचा विक्रम आर अश्विननं पटकावला. त्यानं पॅट कमिन्सचा ७० विकेट्सचा विक्रम मोडला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड ( ६९), टीम साऊदी ( ५६) आणि नॅथन लियॉन ( ५६) यांचा क्रमांक येतो.  किवींनी २९ षटकांत २ बाद ७७ धावा केल्या आहेत.Ind vs NZ Test Final, WTC final 2021

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Wriddhiman Saha  is keeping for India as Rishabh Pant is unwell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app