WTC Final 2021 IND vs NZ : मैदानावर पावसाचा खेळ अन् दुसरीकडे टीम इंडियाच्या सदस्यांचा सुरू होता वेगळाच गेम, Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 08:23 PM2021-06-18T20:23:59+5:302021-06-18T20:24:19+5:30

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : इंग्लंडच्या हवामानाचा लहरीपणा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या मार्गात अडथळा निर्माण करताना दिसत आहे.

WTC final 2021 Ind vs NZ Test : When rain didn't stop play, Team India members enjoyed a game of dart, Watch Video  | WTC Final 2021 IND vs NZ : मैदानावर पावसाचा खेळ अन् दुसरीकडे टीम इंडियाच्या सदस्यांचा सुरू होता वेगळाच गेम, Video 

WTC Final 2021 IND vs NZ : मैदानावर पावसाचा खेळ अन् दुसरीकडे टीम इंडियाच्या सदस्यांचा सुरू होता वेगळाच गेम, Video 

Next
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ऐतिहासिक कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करावा लागला अन् आता सामना 23 जून या राखीव दिवसापर्यंत रंगणार आहे.

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : इंग्लंडच्या हवामानाचा लहरीपणा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या मार्गात अडथळा निर्माण करताना दिसत आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ऐतिहासिक कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करावा लागला अन् आता सामना 23 जून या राखीव दिवसापर्यंत रंगणार आहे. जवळपास दोन-अडीच तास पाऊस पडला अन् साऊदॅम्प्टनच्या खेळपट्टीची पूर्ण वाट लावून गेला. अम्पायर्सनी मैदानाची पाहणी केली अन् पहिल्या दिवसाचा खेळ न खेळवण्याचा निर्णय घेतला. मैदानावर पाऊस पडत असताना टीम इंडियाच्या सदस्यांचा वेगळाच खेळ सुरू होता. बीसीसीआयनं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. WTC Final 2021, WTC Final 2021, 

 ऐतिहासिक सामन्याचा पहिला दिवस वाया गेला, नेटिझन्सनी मीम्सचा पाऊस पाडला!

भारत-न्यूझीलंड या ऐतिहासिक कसोटी सामन्याचे सारेच आतुरतेनं वाट पाहत होते. या मालिकेपूर्वी न्यूझीलंडनं यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून सराव केला. किवींनी ही कसोटी मालिका 1-0 अशी जिंकून 22 वर्षांनंतर इंग्लंडला त्यांच्याच घरी नमवण्याचा पराक्रम केला. दुसरीकडे भारतीय संघाला सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी आंतरसंघ तयार करून तीन दिवस आपापसात सराव केला. त्यामुळे किवींचे पारडे किंचितचे भारी असल्याचा अंदाज सारेच व्यक्त करत आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे खेळपट्टीचा रंगही बदलणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे टीम इंडियानं निवडलेल्या अंतिम 11 खेळाडूंनी विराट कोहलीची चिंता वाढवली आहे. IND vs NZ World Test Championship

पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, पावसानं लावली वाट; राखीव दिवसापर्यंत चालणार सामना


दरम्यान, पाऊस पडत असताना आर अश्विनसह टीम इंडियाचे सदस्यांचा इनडोअर खेळ सुरू होता. पाहा व्हिडीओ...

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : When rain didn't stop play, Team India members enjoyed a game of dart, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app