WTC Final 2021 IND vs NZ : RCBच्या भीडूनं विराट कोहलीचा गेम केला; IPLच्या नेट्समध्ये ठरला होता प्लान अन्...

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी टीम इंडियाला पहिल्या सत्रात दोन मोठे धक्के बसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 03:41 PM2021-06-23T15:41:26+5:302021-06-23T15:42:02+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Kyle Jamieson gets Virat Kohli for the second time & now removes Cheteshwar Pujara | WTC Final 2021 IND vs NZ : RCBच्या भीडूनं विराट कोहलीचा गेम केला; IPLच्या नेट्समध्ये ठरला होता प्लान अन्...

WTC Final 2021 IND vs NZ : RCBच्या भीडूनं विराट कोहलीचा गेम केला; IPLच्या नेट्समध्ये ठरला होता प्लान अन्...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी टीम इंडियाला पहिल्या सत्रात दोन मोठे धक्के बसले.न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत कालच्या २ बाद ६४ धावांवरून सहाव्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला ७ धावांची भर घातल्यानंतर हा धक्का बसला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला ( १३) किवी गोलंदाज कायले जेमिन्सन यानं पुन्हा एकदा बाद केले. जेमिन्सननं पहिल्या डावातही विराटची विकेट घेतली होती आणि याचे डावपेच त्यानं आयपीएल २०२१च्या नेट्समध्येच आखले होते. भारताला ७१ धावांवर विराटच्या रुपानं तिसरा धक्का बसला. त्यापुढील षटकात जेमिन्सननं चेतेश्वर पुजारालाही तंबूत जाण्यास भाग पाडले. 

भारताच्या पहिल्या डावातील २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं २४९ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सन ( ४९) आणि टीम साऊदी ( ३०) यांनी दमदार खेळ केला. पाचव्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मद शमीनं न्यूझीलंडला चार धक्के देत संपूर्ण डावच पलटवला. पण, केन विलियम्सनच्या चिवट खेळीनं अन् टीम साऊदीच्या फटकेबाजीनं किवींनी पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली. भारताने सलामीची विकेट लगेच गमावली असली तरी रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारानं टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. टीम साऊदीनं ही जोडी तोडली. रोहित व चेतेश्वर यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. भारतानं पाचव्या दिवसअखेर २ बाद ६४ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली होती.


आयपीएल २०२१मध्ये काय झालं होतं?
१५ कोटी रुपये मोजून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं न्यूझीलंडच्या ६.८ फूटाच्या गोलंदाजाला करारबद्ध केलं. त्याला आयपीएलच्या १४व्या पर्वात साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यावेळी जेमिन्सननं नेट्समध्ये विराटला ड्यूक बॉलवर गोलंदाजी करण्यास नकार दिला होता. विराटला गोलंदाजी कळू नये यासाठी जेमिन्सननं तो निर्णय घेतला होता आणि त्याचा फायदा WTC Final मध्ये झालेला पाहायला मिळतोय.

 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Kyle Jamieson gets Virat Kohli for the second time & now removes Cheteshwar Pujara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.