WTC Final 2021 IND vs NZ : अऩुष्का शर्मानं लिहिली कविता, दोन ओळीत सांगितलं विराट कोहलीच्या मनात नेमकं काय चाललंय!

WTC final 2021 Ind vs NZ Test भारत-न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल लढतीच्या पहिल्या दिवसाचा पहिले सत्र पावसामुळे रद्द करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 04:11 PM2021-06-18T16:11:26+5:302021-06-18T16:12:34+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Anushka sharma write a poem for virat kohli just ahead of icc wtc final 2021 | WTC Final 2021 IND vs NZ : अऩुष्का शर्मानं लिहिली कविता, दोन ओळीत सांगितलं विराट कोहलीच्या मनात नेमकं काय चाललंय!

WTC Final 2021 IND vs NZ : अऩुष्का शर्मानं लिहिली कविता, दोन ओळीत सांगितलं विराट कोहलीच्या मनात नेमकं काय चाललंय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारत-न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल लढतीच्या पहिल्या दिवसाचा पहिले सत्र पावसामुळे रद्द करण्यात आले. आता टॉससाठी क्रिकेट चाहत्यांना पाच वाजेपर्यंतची प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. इंग्लंडमधील वातावरणाच्या लहरीपणाचा फटका या सामन्याला पहिल्याच दिवशी बसला आहे आणि उर्वरित चार दिवसांचा खेळ होईल की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, साऊदॅम्प्टनच्या हवामानावरून अनुष्का शर्मानं ( Anushka Sharma) इंस्टा स्टोरीवर कवितेच्या दोन ओळी पोस्ट केल्या. त्या ओळीतून तिनं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या मनात नेमकं काय सुरूय ते सांगितलं.

बॉलिवूड अभिनेत्री व विराटची पत्नी अनुष्कानं नर्सरी क्लासमध्ये शिकवण्यात आलेल्या कवितेच्या दोन ओळी Insta Story वर पोस्ट केल्या. तिनं लिहिलं,, रेन रेन, गो अवे.. कम अगैन आफ्टर 5 डेज...  

भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी  IND vs NZ World Test Championship

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Anushka sharma write a poem for virat kohli just ahead of icc wtc final 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.