WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाला 'ही' चार कारणं जबाबदार अन् विराट कोहलीच्या हातून निसटली ट्रॉफी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:21 AM2021-06-24T00:21:18+5:302021-06-24T00:21:33+5:30

१४४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच झालेल्या कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद किवींनी पटकावलं. त्यांनी टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.  

WTC Final 2021 IND vs NZ: four reason for team India loss in WTC Final | WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाला 'ही' चार कारणं जबाबदार अन् विराट कोहलीच्या हातून निसटली ट्रॉफी

WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाला 'ही' चार कारणं जबाबदार अन् विराट कोहलीच्या हातून निसटली ट्रॉफी

Next

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. १४४ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच झालेल्या कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद किवींनी पटकावलं. त्यांनी टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.  WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

तो निर्णय बदलण्याची होती संधी; पण, पराभवानंतर विराट कोहली म्हणतो, त्याबाबत दुःख वाटत नाही!

टीम इंडियाच्या पराभवाची चार प्रमुख कारणं...
 

  • सलामीवीरांचे अपयश 

या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूनं लागला असला तरी भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी संयमी खेळ करून सुरुवातीच्या अवघड खेळपट्टीवर तग धरला होता. पण, रोहि शर्माला पहिल्या डावात ६८ चेंडूंत ३४ धावा करता आल्या आणि शुबमन गिलला २८ धावा...दुसऱ्या डावातही ८२ चेंडू खेळून सेट झालेल्या रोहितला ३० धावांवर माघारी जावं लागलं, तर गिलला ३३ चेंडूंत ८ धावा करता आल्या. त्यामुळे मधल्या फळीवर दडपण वाढले.

  • दुसऱ्या डावात कर्णधार कोहलीचे अपयश  

आयसीसीच्या प्रमुख सामन्यात अपयशी ठरण्याचा कित्ता कोहलीनं इथेही गिरवला. कर्णधार म्हणून आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची संधी त्याच्याकडे चालून आली होती, परंतु तो अपयशी ठरला. पहिल्या डावात त्यानं ४४ धावांची खेळी केली खरी, परंतु जेव्हा गरज होती तेव्हा त्यानं नांगी टाकली. कायले जेमिन्सनच्या जाळ्यात तो दोन्ही डावांत अडकला.

  • न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश

भारतीय गोलंदाजांची ही नेहमीचीच समस्या आहे. प्रमुख फलंदाजांना बाद केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचे शेपूट गुंडाळण्यात त्यांना नेहमी अडचणीचे जाते. न्यूझीलंडच्या ६ विकेट्स १६२ धावांवर पडल्या होत्या. पण, तरीही केन विलियम्सननं तळाच्या फलंदाजांना सोबत घेत २४९ धावा केल्या आणि संघाला ३२ धावांची आघाडी मिळवून दिली. टीम साऊदीनं दमदार खेळ केला. 

  •  जलदगती गोलंदाजांची दिशाहीन कामगिरी

ज्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांनी कमाल केली, त्याच खेळपट्टीवर भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. भारताला चौथ्या जलदगती गोलंदाजाची उणीव जाणवली. पण, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह यांना खास कामगिरी करता आली नाही. मोहम्मद शमीनं खेळपट्टीचा वापर करताना किवी फलंदाजांना अडचणीत आणले, परंतु त्याला इतरांकडून साथ मिळाली नाही.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: WTC Final 2021 IND vs NZ: four reason for team India loss in WTC Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app