WTC final 2021 Ind vs NZ 1st Test :  ऐतिहासिक सामन्याची नाणेफेक झाली, बघा कोणी काय निर्णय घेतला

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 02:30 PM2021-06-19T14:30:16+5:302021-06-19T14:46:05+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ 1st Test :  New Zealand have won the toss and they've decided to bowl first | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test :  ऐतिहासिक सामन्याची नाणेफेक झाली, बघा कोणी काय निर्णय घेतला

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test :  ऐतिहासिक सामन्याची नाणेफेक झाली, बघा कोणी काय निर्णय घेतला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवसाच्या खेळावरही पावसाचे सावट आहे, परंतु मागील 12 तासांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. सकाळी सूर्यानंही दर्शन दिल्यानं आज खेळ सुरू होण्यास काहीच हरकत नव्हती. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून आजचा खेळ सुरू होणार आहे आणि आताच झालेला नाणेफेकीचा कौल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या विरोधात गेला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( New Zealand Elected to ball first) 


विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा 61 वा सामना आहे आणि आशियाई कर्णधार म्हणून हा विक्रम आहे. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा 60 सामन्यांचा विक्रम मोडला.  

भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी  IND vs NZ World Test Championship

न्यूझीलंडचा संघ - टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बी जे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, टीम साऊदी, कायले जेमिन्सन, ट्रेंट बोल्ट, निल वॅगनर  

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ 1st Test :  New Zealand have won the toss and they've decided to bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.