Anaya Bangar Mumbai Indians WPL 2026: भारतीय माजी क्रिकेटपटू संजय बांगर (Sanjay Bangar) यांची ट्रान्सजेंडर (Transgender) मुलगी अनाया बांगरने नवीन वर्षात पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले आणि तिचे फोटो लगेच व्हायरल झाले. तिने १३ जानेवारीला खेळल्या गेलेल्या WPL सामन्याला ग्लॅमरस टच दिला. क्रिकेटची आवड असलेली अनाया सामना खेळण्यासाठी मैदानावर आली नव्हती, तर सामना पाहण्यासाठी आली होती. ती मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील WPL सामना पाहण्यासाठी आली होती.
मुंबई इंडियन्सच्या सामन्याला अनायाची हजेरी
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील WPL 2026 चा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात अनन्याने मुंबई इंडियन्सला पाठिंबा दिला. हे तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवरून दिसून येते. अनन्या बांगरने इंस्टाग्रामवर चार फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एक मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने मारलेल्या एका शक्तिशाली शॉटचा आहे. अनाया बांगर काळ्या रंगाचा ड्रेस घालून WPL सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती. तिने या ड्रेसमधील तिचे सुंदर फोटो देखील शेअर केले आहेत.
अनन्याच्या फोटोची चर्चा
अनन्या बांगरने सामन्यानंतर शेअर केलेले फोटोही आहेत, जे तिने स्वतः स्टेडियममध्ये टिपले होते. याआधी मैदानावरील कॅमेऱ्यांनीही सामना एन्जॉय करतानाचे तिचे फोटो टिपले. अनन्या बांगर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामना पाहण्यासाठी एकटी आली नव्हती, तर एका मैत्रिणीसोबत आली होती. अनन्या बांगर आणि इतर क्रिकेट चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे आणि खेळाडूंच्या कठोर परिश्रमामुळे, मुंबई इंडियन्सने सामना जिंकण्यात यश मिळवले.