विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत

Arjuna Ranatunga Arrest: रणतुंगा यांच्यावर 'पेट्रोलियम घोटाळा' प्रकरणी आरोप आहेत. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाने कोर्टाला सांगितले की, रणतुंगा यांनी आणि त्यांच्या भावाने तेल खरेदीचे करार बदलले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:30 IST2025-12-16T09:29:28+5:302025-12-16T09:30:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
World Cup-winning Sri Lankan captain to be arrested; Arjuna Ranatunga in trouble in petroleum scam case | विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत

विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत

श्रीलंकेचा विश्वचषक विजेता क्रिकेट कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना पेट्रोलियम मंत्री असताना झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांनी सोमवारी कोलंबो कोर्टात माहिती दिली.

रणतुंगा यांच्यावर 'पेट्रोलियम घोटाळा' प्रकरणी आरोप आहेत. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाने कोर्टाला सांगितले की, रणतुंगा यांनी आणि त्यांच्या भावाने तेल खरेदीचे करार बदलले. यामुळे श्रीलंकन सरकारचे सुमारे ८०० दशलक्ष रुपये (जवळपास २३.५ कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले.

भ्रष्टाचार आयोगाने कोर्टाला सांगितले की, अर्जुन रणतुंगा सध्या परदेशात आहेत आणि ते देशात परतताच त्यांना अटक केली जाईल. याच प्रकरणात, रणतुंगा यांचे मोठे बंधू धम्मिका रणतुंगा, जे त्यावेळी सरकारी 'सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन'चे अध्यक्ष होते, यांना सोमवारी अटक करण्यात आली आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मात्र, कोर्टाने त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे.

अर्जुन रणतुंगा यांनी १९९६ साली ऑस्ट्रेलियाला हरवून श्रीलंकेला क्रिकेट विश्वचषक जिंकून दिला होता. मात्र, सध्याचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या सरकारने देशातील मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जी मोहीम हाती घेतली आहे, त्या मोहिमेचा एक भाग म्हणून रणतुंगा बंधूंवर ही कारवाई होत आहे. रणतुंगा यांचे दुसरे बंधू प्रसन्ना रणतुंगा यांनाही गेल्या महिन्यात एका विमा फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती.

Web Title : श्रीलंकाई विश्व कप विजेता रणतुंगा पेट्रोलियम घोटाले में गिरफ्तार हो सकते हैं

Web Summary : श्रीलंका के विश्व कप विजेता कप्तान अर्जुन रणतुंगा को पेट्रोलियम मंत्री रहते हुए कथित भ्रष्टाचार के आरोप में गिरफ्तार किया जा सकता है। उन पर तेल खरीद सौदों को बदलने का आरोप है, जिससे सरकार को भारी वित्तीय नुकसान हुआ। उनके भाई को पहले ही गिरफ्तार किया जा चुका है।

Web Title : Sri Lankan World Cup Winner Ranatunga Faces Arrest in Petroleum Scam

Web Summary : Arjun Ranatunga, Sri Lanka's World Cup-winning captain, may be arrested over alleged corruption during his tenure as Petroleum Minister. He's accused of changing oil purchase deals, causing significant financial losses to the government. His brother has already been arrested in connection with the case.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.