World Cup decision postponed till June 10 | विश्वचषकाचा निर्णय १० जूनपर्यंत लांबणीवर

विश्वचषकाचा निर्णय १० जूनपर्यंत लांबणीवर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बोर्डाने गुरुवारी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेसह अजेंडामध्ये समावेश असलेल्या सर्व प्रकरणांबाबतचा निर्णय १० जूनपर्यंत लांबणीवर टाकला आहे.

विश्वकप स्पर्धेचे आयोजन १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणार होते, पण कोविड-१९ महामारीमुळे ही स्पर्धा स्थगित करण्याचा व या विंडोचा उपयोग सध्या स्थगित इंडियन प्रीमिअर लीगच्या आयोजनासाठी करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

आयसीसीने बोर्डच्या टेलिकॉन्फरन्सनंतर म्हटले की,‘बोर्ड आयसीसी प्रबंधनाला विनंती करते की कोविड-१९ महामारीमुळे सातत्याने बदलत असलेली जनस्वास्थ्य स्थिती बघता विविध आपात्कालीन पर्यायांबाबत संबंधित भागधारकांसोबत चर्चा सुरू ठेवावी. (वृत्तसंस्था)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:  World Cup decision postponed till June 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.