Women's T20 World Cup: India Women win by 17 runs against Australia | Women's T20 World Cup: पूनमच्या गुगलीचा चमत्कार; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडियाचा 'जय'जयकार

Women's T20 World Cup: पूनमच्या गुगलीचा चमत्कार; गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून टीम इंडियाचा 'जय'जयकार

सिडनी: आयसीसी महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी- 20 विश्वचषकाचा भारतविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या  सलामीच्या सामन्यात 17 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताने ऑस्ट्रेलिया संघाला 115 धावातच गुंडाळले.

आयसीसी महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी- 20 विश्वचषकाचा सलामीच्या भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले होते. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. मात्र भारतीय संघाची गोलंदाज पूनम यादवच्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने झटपट विकेट्स गमावले. 

 

ऑस्ट्रेलियाची विकेटकीपर अ‍ॅलिसा हेली सर्वाधिक 51 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची फलंदाज अ‍ॅश्ले गार्डनर शेवटपर्यत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र शिखा पांडेने तिला झेलबाद करत विजयाचा मार्ग मोकळा केला. अ‍ॅश्ले गार्डनरने 36 चेंडूत 34 धावा केल्या. 

भारताीय संघाची गोलंदाज पूनम यादवने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर शिखा पांडेला दोन विकेट्स आणि राजेश्र्वरी गायकवाडला एक विकेट्स घेण्यात यश मिळाले.

दरम्यान भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. भारताने चार षटकांमध्ये 41 धावा केल्या होत्या. मात्र ऑस्ट्रेलियाची फिरकीपटूने स जोनासेनने भारताची सलामी फलंदाज स्मृती मानधना 10 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. 

आपला पहिला ट्वेंटी- 20 विश्वचषक सामना खेळणारी शफाली वर्मा फटकेबाजीच्या प्रयत्नात माघारी परतली. तिने धमाकेदार खेळी करत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला, पण 15 चेंडूत 29 धावा करून ती बाद झाली. ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडला शफालीला झेलबाद करण्यात यश आले.

भारताची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर देखील फक्त 2 धावा करत यष्टीचीत झाली. यानंतर दिप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जेमिमाला डेलिसा किमिन्सेने पायचीत केले. जेमिमाने 33 चेंडूत 26 धावा केल्या. त्यामुळे दीप्ती शर्मा आणि जेमिमाच्या धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला 133 धावांचे आव्हान दिले आहे.

Read in English

Web Title: Women's T20 World Cup: India Women win by 17 runs against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.