मुंबई : बीसीसीआयने आपल्या वार्षिक करारामधून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळले आणि त्यानंतर एकच गहजब झाला. कारण धोनीचे चाहते यावेळी चांगलेच निराश झालेले पाहायला मिळाले. या वार्षिक कराराची घोषणा करताना बीसीसीआयने धोनीला वगळले आहे. पण याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली नेमके म्हणाले तरी काय, जाणून घ्या...

Related image

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केलेल्या करारातून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळले. करारामध्ये धोनीचे नाव नसल्यानं पुन्हा त्याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला. हा धोनी पर्वाचा अंत समजावा का? बीसीसीआयच्या या सेंट्रल कराराचा नक्की अर्थ काय? असे बरेच प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

Related image

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो सैन्यदलाच्या सेवेतही रुजू झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या धोनीला सेंट्रल करारातून वगळण्यात आले. पण धोनीने फक्त एक गोष्ट केली की, त्याला पुन्हा एकदा बीसीसीआय आपल्या करारामध्ये सामील करून घेऊ शकते.

Related image

बीसीसीआयने जाहीर केलेला करार हा सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी बीसीसीआयचे नवीन करार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनी हा आगामी करारामध्ये आपल्याला दिसू शकतो.

Related image

बीसीसीआयच्या करारामधून धोनीला का वगळण्यात आले, याबाबत गांगुली यांना प्रश्न विचारण्यात आला. पण यावर कोणतीही टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला. याबाबत गांगुली म्हणाले की, " धोनीला बीसीसीआयच्या वार्षिक करारामधून का वगळण्यात आले, याबाबत मला कोणतेही भाष्या करायचे नाही."

Web Title: Why BCCI excludes MS Dhoni from contract, see what President Sourav Ganguly said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.