IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी

IPL 2025 Winner Prediction: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोणता संघ बाजी मारणार? याबाबत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 18:40 IST2025-06-01T18:38:24+5:302025-06-01T18:40:26+5:30

whatsapp join usJoin us
Who will win IPL 2025 Final? David Warner makes bold prediction, names Player of the Match | IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी

IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलच्या यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.आरसीबीचा संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला असून मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ जेतेपदासाठी आरसीबीशी सामना खेळेल. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने एक मोठी भविष्यवाणी केली. 

आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी एका चाहत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आयपीएल विजेता कॅप्टन वॉर्नरला विचारले की, तुम्हाला काय वाटते की, यंदा कोणता संघ आयपीएल सामना जिंकेल? असे विचारले. यावर वॉर्नरने कमेंटमध्ये म्हटले की, "आरसीबी आणि जोश हेझलवूड सामनावीर असेल."

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाने दमदार कामगिरी करून दाखवली. आरसीबीच्या फलंदाजासह गोलंदाजही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आणि त्यानंतर क्वालिफायर-१ मध्ये पंजाब किंग्जचा आठ विकेट्सने दारूण पराभव केला.

आयपीएलच्या चालू हंगामात विराट कोहलीने आरसीबीसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये एकूण ६१४ धावा केल्या आहेत. ज्यात आठ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या व्यतिरिक्त  रजत पाटीदार, जितेश शर्मा यांनी मोक्याच्या क्षणी चांगली खेळी केली. तर, गोलंदाज जोस हेझलवूडने आतापर्यंत २१ विकेट्स घेतल्या आहेत.

Web Title: Who will win IPL 2025 Final? David Warner makes bold prediction, names Player of the Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.