What does Virat kohli do even on the holidays; know the Fitness Funda | सुट्टीच्या दिवशीही विराट काय करतो; जाणून घ्या फिटनेस फंडा
सुट्टीच्या दिवशीही विराट काय करतो; जाणून घ्या फिटनेस फंडा

मुंबई: भारताचा कर्णधार विराट कोहली हा सर्वात फिट खेळाडू असल्याचे म्हटले जाते. पण विराट स्वत: ला फिट ठेवण्यासाठी नेमकं करतो तरी काय, जाणून घ्या विराटचा फिटनेस फंडा...

Image result for virat kohli in gym

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. टीम इंडियानं इंदूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं पहिली कसोटी अडीच दिवसातच खिशात घातली. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तरीही भारतीय संघ इंदूरमध्येच आहे.

भारतीय संघाची इंदूरमध्ये सध्या सुट्टी सुरु आहे. कारण सध्या नेट्स सुरु झालेले नाहीत. पण नेट्स सुरु झालेले नसले तरी विराट फिटनेसच्या बाबातीत सजग आहे. सुट्टीचा दिवस असला तरी विराट येथील जिममध्ये गेल्याचे पाहायला मिळाले. जिममध्ये गेल्यावर विराटने व्यायाम केल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच वायरल होताना दिसत आहे.

पहिल्या विजयानंतर कोहलीने घेतली आपल्या स्पेशल फॅनची भेट
इंदूर : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. पण सामना संपल्यावर कोहलीने आपल्या एका स्पशेल फॅनची भेट घेतल्याचेही पाहायला मिळाले.

सामना जिंकल्यावर भारतीय खेळाडू पेव्हेलियनमधून बाहेर पडत होते. त्यावेळी तिथे एक विराटची फॅन बसली होती. या फॅनचे नाव पुजा आहे. पुजारा एक वेगळाच आजार आहे. या आजारामुळे तिची हाडं मोडतात आणि काही वेळाने ती मोडलेली हाडं आपसूकच जोडली जातात. त्यामुळे पुजा जास्त करून घराबाहेर पडत नाही. पण कोहलीला पाहण्यासाठी ती सामना पाहायला आली होती.

काही खेळाडूंनंतर कोहली पेव्हेलियनमधून बाहेर पडला आणि थेट पुजाला भेटला. कोहलीने पुजाची विचारपूस केली. त्यानंतर पुजाने आणलेल्या कॅपवर कोहलीने सहीदेखील केली.


जीव धोक्यात घालून तो कोहलीला मैदानात भेटला अन्...
 आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अशीच एक गोष्ट क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली. एक चाहता आपला जीव धोक्यात घालून मैदानात शिरला आणि थेट भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या दिशेने धावत सुटला. त्यानंतर जे काही घडले, ते पाहण्यासारखे होते.

भारताने इंदूर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने बांगलादेशला तब्बल एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात एक रंजकदार गोष्ट पाहायला मिळाली. एका चाहत्याने आपल्या अंगावर विराटचे नाव लिहिले होते. अचानक हा चाहता आपल्या आसनावरून उठला. समोर असलेली मोठी जाळी त्याने ओलांडली. ही जाळी ओलांडत असताना तो पडणार होता, पण थोडक्यात वाचला. जर तो पडला असता तर त्याला नक्कीच बर मार बसला असता आणि त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता.

जाळीवरून उडी मारून हा चाहता थेट मैदानात पोहोचला. मैदानात भारतीय संघ एकत्रितपणे उभा होता. हा चाहता धावत भारतीय संघावर पोहोचला. तिथे उभ्या असलेल्या कोहलीला तो भेटला. त्यावेळीच काही सुरक्षा रक्षकांनी मैदानात धाव घेतली आणि त्या चाहत्याची धरपकड करायला त्यांनी सुरुवात केली. यावेळी कोहलीने या सुरक्षा रक्षकांना थांबवले आणि त्या चाहत्याला शांतपणे घेऊन जाण्यास सांगितले.

Web Title: What does Virat kohli do even on the holidays; know the Fitness Funda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.