नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने समाजमाध्यमांवर एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो सलामीवीर शिखर धवनच्या फलंदाजीला उभं राहण्याच्या शैलीची हुबेहुब नक्कल करताना दिसतो आहे. विराटने केलेली ही नक्कल सध्या समाजमाध्यमावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी विराटने शिखर धवन फलंदाजीला आल्यावर कसा करतो, हेसुद्धा यात करून दाखवले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना विराट म्हणाला की, “मी शिखर धवनच्या फलंदाजीची नक्कल करणार आहे. कारण तो फलंदाजीला आल्यानंतर एका वेगळ्याच विश्वात हरवलेला असतो. तो यावेळी काही वेगळ्या कृती करतो, ज्या एक सहकारी म्हणून बघणे मजेशीर असते.”