OMG: राहुल टेवाटिया IPL 2020त प्रतिस्पर्धींवरच नव्हे तर मेंटर शेन वॉर्नवर पडला भारी; पाहा Video

राहुल टेवाटियानं ९ सामन्यांत ८ डावांत  ४०.६०च्या सरासरीनं २०२ धावा चोपल्या आहेत. त्यात दोन अर्धशतकांचा,१० चौकार व १५ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या नावावर ५ विकेट्सही आहेत. 

By स्वदेश घाणेकर | Published: October 17, 2020 04:52 PM2020-10-17T16:52:37+5:302020-10-17T16:53:09+5:30

whatsapp join usJoin us
Watch: Rahul Tewatia And Shane Warne Indulge In An Intense On-Field Battle In The Rajasthan Royals’ Training;  | OMG: राहुल टेवाटिया IPL 2020त प्रतिस्पर्धींवरच नव्हे तर मेंटर शेन वॉर्नवर पडला भारी; पाहा Video

OMG: राहुल टेवाटिया IPL 2020त प्रतिस्पर्धींवरच नव्हे तर मेंटर शेन वॉर्नवर पडला भारी; पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) १३व्या पर्वात राहुल टेवाटिया हे नाव सर्वांच्या ओठी नक्की पक्क बसलं असेल. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) संघाचा मॅच फिनिशर म्हणून टेवाटिया सर्वांच्या लक्षात राहिला आहे. त्यानं आतापर्यंत RRला अशक्यप्राय विजय मिळवून दिले. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात टेवाटियानं आपली छाप सोडली आहे. प्रतिस्पर्धी संघालाच नव्हे तर टेवाटियानं RRचा मेंटर शेन वॉर्न यालाही पराभूत केले आहे.  

राहुल टेवाटिया आणि शेन वॉर्न यांच्यात एक RRच्या सराव सत्रादरम्यान एक स्पर्धा रंगली. त्यात जगातील सर्वात यशस्वी फिरकीपटू म्हणून नाव कमावलेल्या वॉर्नला टेवाटियानं पराभूत केले. एका षटकात अचूक टप्पा टाकणाऱ्या गोलंदाजाची स्पर्धा या दोघांमध्ये टेवाटियानं १-० अशी बाजी मारली.


दरम्यान, Indian Premier League ( IPL 2020) मधील प्ले ऑफचे आव्हान जीवंत राखण्यासाठी राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals) आता पुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल. आज RRने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. IPL 2020त सातत्यानं अपयशी ठरलेल्या रॉबीन उथप्पाला RRने बेन स्टोक्ससह सलामीला पाठवण्याचा डाव खेळून जोस बटलरवर मॅच फिनिशरची जबाबदारी टाकली आहे. 

उथप्पानं वॉशिंग्टन सूंदरनं टाकलेल्या चौथ्या षटकात चार चौकार खेचून एका विक्रमाला गवसणी घातली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ४५००+ धावा करणारा उथप्पा हा एकून ९वा आणि सहावा भारतीय खेळाडू ठरला. IPL 2020त प्रथम सलामीला आलेल्या उथप्पा पूर्वीच्या अंदाजात दिसला. त्यानं पदलालित्य दाखवत सुरेख फटके मारले. बेन स्टोक्स संयमी खेळ करत त्याला साथ देत होता. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या, परंतु ख्रिस मॉरिसनं टाकलेल्या सहाव्या षटकात स्टोक्स ( १५) बाद झाला.

विराट कोहलीनं ८वे षटक युझवेंद्र चहलच्या हाती सोपवलं. संजू सॅमसननं पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून त्याचं स्वागत केलं. पण, याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहलनं RRला मोठा धक्का दिला. त्यानं २२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ४१ धावा करणाऱ्या उथप्पाला माघारी पाठवले. पुढच्याच चेंडूवर सॅमसनही ( ९) बाद झाला. त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी ५८ धावांची भागीदारी करताना RRचा डाव सावरला. ख्रिस मॉरिसनं ही भागीदारी तोडली. जोस बटलर २४ धावांवर माघारी परतला. RRच्या १५.४ षटकांत ४ बाद १३१ धावा झाल्या आहेत. 

Web Title: Watch: Rahul Tewatia And Shane Warne Indulge In An Intense On-Field Battle In The Rajasthan Royals’ Training; 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.