WATCH: Nigerian batsman stops batting, races off the ground to attend 'nature's call' | Video : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....
Video : लघुशंका आल्यावर बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहेर सुसाट धावू लागला अन्....

क्रिकेट सामन्यात प्रेक्षकानं मैदानावर धाव घेत व्यत्यय आणणं, यात काही नवीन नाही. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत हे चित्र दोन-तीन वेळा पाहायला मिळाले. पण, सामना सुरू असताना बॅट्समन खेळ सोडून मैदानाबाहरे सुसाट धावल्याचा प्रसंग पूर्वी कधी घडला नसावा. आयसीसी पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत नायजेरिया विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामन्यात हा प्रसंग घडला आणि स्टेडियमवर उपस्थित प्रत्येकाला हसू आवरता आवरेना...

अबु धाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर हा सामना सुरु होता. तेव्हा नायजेरियाचा फलंदाज सुलैमन सुन्सेवे यानं सामना सुरू असताना बाथरूम ब्रेक घेतला. सातव्या षटकानंतर तो थेट मैदानाबाहेर धावत सुटला. रुन्सेवे 18 धावावर फलंदाजी करत होता आणि नायजेरियाच्या सात षटकांत 2 बाद 38 धावा झाल्या होत्या. तेव्हा तो लघुशंकेसाठी ड्रेसिंगरुममध्ये धावत सुटला. त्यानं असं का केलं हे नॉन स्ट्राईकरवर उभ्या असलेल्या चिमेझी ओनवुझुलीकसह कोणालाच काही कळलं नाही. संभ्रमात पडलेला  नायजेरीयाचा कर्णधार अॅडेमोला ओनिकोयी फलंदाजीला मैदानावर आला. पण, लगेच सुन्सेवे मैदानावर परतला आणि ओनिकोयी माघारी गेला. पंचांनीही सुन्सेवेला फलंदाजी करण्यास सांगितले. 

पाहा व्हिडीओ... 


कॅनडानं हा सामना 50 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना कॅनडानं नितीश कुमार ( 57) आणि हम्झा तारीक ( 33) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 7 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात नायजेरीयाला 8 बाद 109 धावा करता आल्या. 


Web Title: WATCH: Nigerian batsman stops batting, races off the ground to attend 'nature's call'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.