प्रेक्षकांशिवाय क्रिकेट खेळणे म्हणजे...; Virat Kohli नं मांडलं स्पष्ट मत

कोरोना व्हायरसचे संकट अजून किती काळ आपल्यासोबत राहील याबाबत कुणीच ठामपणे सांगू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 01:10 PM2020-05-08T13:10:05+5:302020-05-08T13:10:47+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli on prospect of cricket behind closed doors svg | प्रेक्षकांशिवाय क्रिकेट खेळणे म्हणजे...; Virat Kohli नं मांडलं स्पष्ट मत

प्रेक्षकांशिवाय क्रिकेट खेळणे म्हणजे...; Virat Kohli नं मांडलं स्पष्ट मत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी 39 लाख, 17,585 इतकी झाली असून 13 लाख, 44,136 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 2 लाख 70,720 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानातील रुग्णांची संख्या 25, 837 झाली असून 594 जणांचा मृत्यू झाला आहे. 7530 लोकं बरी झाली आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 56,409 वर पोहोचला असून 16,790 रुग्ण बरे झाले आहेत. 1890 जणांना प्राण गमवावे लागले. कोरोना व्हायरसचे संकट अजून किती काळ आपल्यासोबत राहील याबाबत कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे क्रीडा स्पर्धा बंद स्टेडियमवर खेळवण्याचा विचार सुरू आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या पर्यायाशी फारसा सहमत नाही, परंतु लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे, हे तो कबुल करतो.

प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यावर कोहलीनं शुक्रवारी स्पष्ट मत व्यक्त केलं. स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात तो म्हणाला,''सध्याची परिस्थिती पाहता प्रेक्षकांविना क्रिकेट सुरू केले जाऊ शकते. पण, याचा लोकं आणि खेळाडू कसा स्वीकार करतील, हे मलाही माहीत नाही. आम्हाला खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याची सवय झाली आहे. त्यातूनच जिंकण्याची जिद्द निर्माण होते आणि आम्हाला बळ मिळतं. चुरशीच्या सामन्यात खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यात जाणवणारे ते दडपण, बंद स्टेडियममध्ये कसे निर्माण होईल? ती भावना निर्माण करणे अवघड आहे.''
 


Virat Kohliचे चाहत्यांना आवाहन; क्रिती सॅनोन, सारा अली खान यांच्यासोबत तयार केला व्हिडीओ

कोरोना व्हायरसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी लागली. त्यामुळे बऱ्याच सेलिब्रेटींना आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येत आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही आहे. पण, कोहली सोशल मीडियावरून चाहत्यांना वारंवार सरकारच्या नियमांचे पालन करा असे आवाहन करत आहे. सोमवारी त्यानं एक व्हिडीओ पोस्ट करून आणखी एक आवाहन केलं आहे. यावेळी त्याच्यासोबत क्रिती सॅनोन, सारा अली खान आणि आयुषमान खुराणा हे बॉलिवूड सेलिब्रेटीही आहेत.

कोरोना व्हायरस संबंधात सध्या फेक व्हिडीओ, मॅसेज सर्रास फॉरवर्ड केले जात आहेत. असे मॅसेज फॉरवर्ड करू नका, असे आवाहन या व्हिडीओतून करण्यात आले आहे. TikTok च्या 'Mat Kar Forward' या मोहीमेसाठी हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक: दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू Corona Positive; यकृत अन् मूत्रपिंड झाले निकामी

शाहिद आफ्रिदीच्या All Time वर्ल्ड कप संघात Sachin Tendulkarला स्थान नाही

इंग्लंडच्या विश्वविक्रमी फलंदाजाचे निधन; आजही 'तो' विक्रम अबाधित

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेवर कुस्तीपटू बबिता फोगाटचं ट्विट, म्हणाली...

Corona Virus : पाकिस्तानी फलंदाजाच्या तिहेरी शतकाची बॅट पुण्याच्या संग्रहालयात; मोजले लाखो रुपये

Web Title: Virat Kohli on prospect of cricket behind closed doors svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.