पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल विराट कोहलीने केला मोठा खुलासा, सांगितले का रद्द करावा लागला सामना

पहिल्या पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. हा सामना रद्द का करावा लागला, याबद्दल कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 05:40 PM2019-11-21T17:40:34+5:302019-11-21T17:41:05+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli made a big reveal about the first day night test, said why the match had to be canceled | पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल विराट कोहलीने केला मोठा खुलासा, सांगितले का रद्द करावा लागला सामना

पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल विराट कोहलीने केला मोठा खुलासा, सांगितले का रद्द करावा लागला सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारतामध्ये पहिल्या डे नाइट टेस्ट सामना उद्यापासून सुरु होणार आहे. या ऐतिहासिक सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण पहिल्या पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. हा सामना रद्द का करावा लागला, याबद्दल कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

 

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये उद्यापासून पहिल्या डे नाइट टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच डे नाइट टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. पण यापूर्वीही भारताची एक डे नाइट टेस्ट मॅच होणार होती. पण या मॅचचे नेमके काय झाले, याबाबत कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

भारताचा संघ गेल्यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारताचा संघ कसोटी मालिकाही खेळणार होता. या कसोटी मालिकेत भारताने एक सामना डे नाइट खेळावा, अशी ऑस्ट्रेलियाने विनंती केली होती. पण भारताने ही विनंती मान्य केली नाही. भारताने डे नाइट टेस्ट खेळायला तेव्हा का नकार दिला, याबाबत कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे.

OMG...! what a first day-night test match craze? tickets sold in Black | बाबो...! डे-नाईट टेस्टची क्रेझ केवढी? चक्क ब्लॅकने तिकिटे मिळू लागली

या बाबत कोहली म्हणाला की, " डे नाइट कसोटी खेळणे सोपे नसते. या सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू वापरला जातो. या चेंडूचा तुम्हाला चांगला सराव असेल तरच तुम्ही डे नाइट टेस्ट खेळू शकता. ही गोष्ट पटकन स्वीकारण्यासारखी नक्कीच नाही. जर ही गोष्ट फार पूर्वी ठरली असती तर आम्ही विनंती स्वीकारून डे नाइट टेस्ट मॅच खेळलो असतो. पण ऐनवेळी या गोष्टी ठरवून होणार नाही." 
 

Web Title: Virat Kohli made a big reveal about the first day night test, said why the match had to be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.