विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या तोडीसतोड कामगिरी करणे सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या फलंदाजांना जमलेली नाही. विराटची प्रत्येक खेळी ही नव्या विक्रमाला गवसणी घालणारी आहे. त्यामुळे त्याला टक्कर देण्याची हिंमत कोणताही गोलंदाज दाखवत नाही. जगात विराटला कोणाचेही आव्हान नसताना संघातूनच त्याला 'तगडं' आव्हान मिळू लागले आहे. आता आम्ही तुम्हाला एक फोटो दाखवणार आहोत आणि तो पाहून तुम्हालाही हे पटेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणूनही विराटनं ओळख निर्माण केली आहे. तंदुरुस्तीच्या बाबतीत विराट किती आग्रही आहे, याची सर्वांना जाण आहे. तंदुरुस्तीसाठी त्यानं शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासारखी तंदुरुस्ती आज प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न आहे. पण, तंदुरुस्तीच्या बाबतीत त्याला संघातच आव्हान मिळताना दिसत आहे. 

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यानं इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला. त्यात शिखर धवन, मनिष पांडे, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. या पाचही जणांनी विदाऊट टी शर्ट  शिवाय फोटो शेअर केले. त्यात सैनीच्या पोटावरील ऐट  पॅक पाहून थक्क व्हायला होत आहे. या बाबतीत विराटचे सिक्स पॅकही पानी कम चाय असल्यासारखे वाटत आहेत.


27 वर्षीय सैनीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानं 7 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत.  आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातील तो एक प्रबळ दावेदार मानला जात आहे.

 

Web Title: Virat Kohli Has Competition, Did you see Navdeep Saini’s Eight-Pack Abs?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.