virat Kohli had a record on Instagram, but Cristiano Ronaldo player has four times more followers than him | कोहलीने इन्स्टाग्रामवर केला होता विक्रम, पण 'या' खेळाडूकडे त्याच्यापेक्षा चार पटीने जास्त आहेत फॉलोअर्स

कोहलीने इन्स्टाग्रामवर केला होता विक्रम, पण 'या' खेळाडूकडे त्याच्यापेक्षा चार पटीने जास्त आहेत फॉलोअर्स

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे इन्साग्रामवर तब्बल 5 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. हा विक्रम करणारा कोहली हा पहिला भारतीय आहे. पण कोहलीपेक्षा तब्बल चार पटीने जास्त असलेला खेळाडूही असल्याचे आता समोर आले आहे.

इन्स्टाग्रामवर कोहलीनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा दुसऱ्या क्रमांकाची आहे. प्रियांकाचे 4.99 कोटी फॉलोअर्स आहेत. सोशल मिडीयावरील कमाईमध्ये कोहली एका वर्षात 8.3 कोटी रुपये मिळवत 11 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कोहलीची क्रेझ चांगलीच वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विराट कोहली सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात नाही. पण तरीदेखील त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आहे. कोहलीचे भारतीय चाहते आहेतच, पण त्यापेक्षा परदेशामध्ये आता त्याची क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे.

कोहलीकडे सध्याच्या घडीला काही आंतरराष्ट्रीय ब्रँड आहेत. त्याच्या जाहिरातींमध्ये कोहली झळकताना दिसतो. त्याचबरोबर सोशल मीडियामध्येही कोहलीचा चांगला दबदबा आहे. कोहलीच्या एका पोस्टवर कोट्यावधी लोकांची उडी पडते. त्याचबरोबर कोहली भारतीय खेळाडूंमध्ये सध्याच्या घडीला सर्वात जास्त पैसे कमावत असल्याचेही दिसत आहे.

कोहलीपेक्षा चार पट कोणत्या खेळाडूला चाहते पसंत करतात, याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर तो खेळाडू आहे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो. रोनाल्डोचे २०.४ कोटी चाहते सध्या फक्त इन्स्टाग्रामवर आहेत. म्हणजेच जवळपास २०४ मिलियन फॉलोअर्स रोनाल्डोचे आहेत.

Web Title: virat Kohli had a record on Instagram, but Cristiano Ronaldo player has four times more followers than him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.